आजींना नातवंडेच जास्त आवडतात

    30-Nov-2021
Total Views |
 
 
एमाेरी विद्यापीठातील संशाेधनाने समजावर केले शिक्कामाेर्तब
 

grandmother_1   
 
 
आजींचे प्रेम मुलांपेक्षा नातवंडांवर जास्त असण्याच्या समजावर एका शास्त्रीय संशाेधनातून शिक्कामाेर्तब करण्यात आले आहे. आपल्या मुलांपेक्षा आजींना नातवंडे जास्त प्रिय असल्याचे या संशाेधनातून सिद्ध झाले. आपल्या मुलांपेक्षा आजींची भावनिक जवळीक नातवंडांबराेबर जास्त असते. यासाठी करण्यात आलेल्या संशाेधनात सहभागी झालेल्या आजींच्या मेंदूंचे स्कॅनिंग करण्यात आले हाेते.या आजी आपल्या नाती-नातवांचे फाेटाे बघत असताना हे स्कॅनिंग केले गेले. हे फाेटाे पाहत असताना आजींच्या मेंदूतील ‘भावनात्मक सहानुभूती’बराेबर संबंधित असलेला भाग जास्त सक्रिय झाल्याचे दिसून आले.दुसऱ्या व्यक्तीसारख्याच भावनेची अनुभूती येणे म्हणजे ‘भावनात्मक सहानुभूती.’ याचे एक उदाहरण म्हणजे, आपल्यासमाेर असलेल्या व्यक्तीला वेदना हाेत असताना आपल्यालाही त्या जाणवणे.
 
या आजींना त्यांच्या मुला-मुलींचे फाेटाे दाखवले तेव्हा त्यांच्या मेंदूतील ‘संज्ञानात्मक सहानुभूती’बराेबर संबंधित भाग सक्रिय झाल्याचे दिसले. दुसऱ्यांच्या भावना समजणे असा त्याचा अर्थ आहे. पण, यात समाेरच्या व्यक्तीप्रमाणे तुम्हाला वाटत नाही.एमाेरी विद्यापीठातील मानवशास्त्र विभागातील प्राध्यापक जेम्स रिलिंग म्हणाले, की भावनात्मक घटनांबराेबर संबंधित असलेले मेंदूतील भाग सक्रिय हाेत असलेल्या आजींवरील प्रयाेगात दिसले आहे.तीन ते बारा वर्षे वयांची नातवंडे असलेल्या पन्नास आजींना या संशाेधनात सहभागी करण्यात आले हाेते.त्यांना त्यांची नातवंडे आणि मुला-मुलींचे फाेटाेही दाखवले गेले. नंतर त्यांच्याकडून एक प्रश्नावली भरून घेण्यात आली. मुले आपल्या आई-वडिलांना अधिक समजून घेत असली, तरी भावनात्मकदृष्ट्या आजींची जवळीक नातवंडांबराेबर जास्त असल्याचे यात स्पष्ट झाल