इंग्रजीतील संकल्पनांसाठी पहिलीपासून दैनंदिन वापरातील शब्द शिकवावेत

    30-Nov-2021
Total Views |
 
 
वर्षा गायकवाड यांचे शिक्षण विभागाला निर्देश

gaikwad_1  H x  
 
 
राज्यात मराठीतून शिक्षण अनिवार्य आहे. तथापि, विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांत बालपणापासून मराठीसाेबतच इंग्रजीतील संकल्पना स्पष्ट हाेण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व मराठी माध्यमाच्या शाळांत पहिलीपासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास लागू करण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले.विद्यार्थ्यांना मराठीबराेबरच इंग्रजीतील संज्ञा, संकल्पना अधिक स्पष्ट व्हाव्यात, इंग्रजी शब्दांची ओळख व्हावी, यासाठी प्रा.
गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक घेण्यात आली.
 
विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशाेधन मंडळाचे (बालभारती) संचालक विवेक गाेसावी हे प्रत्यक्ष, तर शिक्षण आयुक्त विशाल साेळंकी, राज्य शैक्षणिक संशाेधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक देवेंद्र सिंग, शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर, शिक्षण संचालक (माध्यमिक) महेश पालकर ऑनलाइन उपस्थित हाेते.सध्या 488 आदर्श शाळांत प्रायाेगिक तत्त्वावर पहिलीच्या अभ्यासक्रमात एकात्मिक व द्वैभाषिक पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे यश पाहता मराठी शाळांत याची अंमलबजावणी करण्यात येईल. त्याचप्रमाणे टप्प्याटप्प्याने पुढील वर्गाच्या अभ्यासक्रमात इतर शाळांत याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे गायकवाड यांनी सांगितले.यासाठी पूरक पाठ्यपुस्तकांची रचना करावी, असे निर्देशही त्यांनी बालभारतीला दिले.