4 डिसेंबरला 2021 मधील शेवटचे सूर्यग्रहण खग्रास सूर्यग्रहण

    30-Nov-2021
Total Views |
 
सकाळी 10 वाजून 59 मिनिटांनी भारताशिवाय इतरत्र दिसणार
 

eclipse_1  H x  
 
 
2021 मधील शेवटचे सूर्यग्रहण येत्या 4 डिसेंबर 2021 ला आहे. यापूर्वी 19 नाेव्हेंबरला झालेल्या चंद्र ग्रहणानंतर 15 दिवसांनी 4 डिसेंबरला खग्रास म्हणजे पूर्ण सूर्यग्रहण हाेत आहे.4 डिसेंबरचे सूर्यग्रहण कार्तिक वद्य अमावस्येला आणि वृश्चिक राशीत हाेत आहे. सूर्यग्रहणाची सुरुवात सकाळी 10 वाजून 59 मिनिटांनी हाेईल व दुपारी 3 वाजून 57 मिनिटांनी ग्रहण सुटेल. पण हे ग्रहण भारतात दिसणार नाही. अमेरिकन अंतराळ संशाेधन संस्था नॅशनल एराेनाॅट्निस अ‍ॅन्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (नासा) च्या प्रव्नत्याने दिलेल्या माहितीनुसार, हे सूर्यग्रहण जगाच्या फारच कमी भागात दिसणार आहे.त्यात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, अंटा्निर्टकामध्ये हे ग्रहण पूर्ण स्वरूपात दिसणार आहे. अंतराळात चंद्र आणि पृथ्वी एकाच ओळीत येतात त्यावेळी सूर्यग्रहण हाेते.
 
याचा अर्थ असा की, सूर्य आणि पृथ्वीच्या मधाेमध चंद्र आल्यास चंद्राची सावली सूर्यावर पडते. सूर्याच्या तुलनेत चंद्राचा आकार छाेटा आहे. त्यामुळे चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. त्यामुळे सूर्याची बाह्य किनार याला खगाेलशास्त्रीय भाषेत ‘काेराेना’ म्हणतात. हे दृश्य अत्यंत विलाेभनीय आणि नयनरम्य असते. 2021 चे पहिले सूर्यग्रहण 10 जूनला झाले हाेते. 4 डिसेंबरचे दुसरे सूर्यग्रहण आहे. गेल्या तीन वर्षांपासून डिसेंबर महिन्यात सूर्यग्रहण येत आहे. सामान्यपणे एका वर्षांत दाेन सूर्यग्रहण आणि दाेन चंद्रग्रहण अशी एकूण 4 ग्रहणे हाेतात. ही सामान्य नैसर्गिक परंपरा आहे.पण कधी कधी तीन ग्रहणे हाेतात.ज्याेतिष शास्त्राच्या दृष्टीने 2021 च्या शेवटच्या सूर्यग्रहणाचे परिणाम भारतात राजकीय उलथापालथ निर्माण करील.विशेषतः गेल्या एक वर्षापासून सुरू असलेला शेतकरी आंदाेलनाचा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवर प्रतिकूल परिणाम हाेण्याची श्नयता आहे.
 
विकासाच्या संदर्भात केंद्र सरकार महत्त्वाच्या याेजना जाहीर करण्याची श्नयता आहे असे ग्रहसंकेत आहेत. तसेच भारतात शेती उत्पादन वाढेल. हे ग्रहण ऑस्ट्रेलियात दिसणार असल्यामुळे सूर्य ग्रहणाचे दिवशी 4 डिसेंबरला अवकाळी पाऊस आणि समुद्री वादळ हाेऊन ऑस्ट्रेलियात ग्रहणाचा नकारात्मक परिणाम हाेतील.या सूर्यग्रहणाचे वैशिष्ट्य असे की, नैसर्गिक कुंडलीमध्ये कर्मस्थानाची रास ग्रहणस्पर्शाचे वेळी उदय हाेणार आहे.मकर लग्न आणि वृषभ नवमांश असलेले हे सूर्यग्रहण मकर लग्नाच्या लाभस्थानात असलेल्या सूर्यचंद्रामुळे आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत देत आहे, तर व्ययस्थानी असलेला शुक्र ग्रह परकीय गुंतवणुकीचे प्रयत्न यशस्वी हाेतील. द्वितीय स्थानी असलेला गुरू नाेकऱ्यांच्या नव्या संधी निर्माण करील, असे या सूर्यग्रहणाचे काही शुभसंकेत आहेत.