ऑफीसमध्येफोन चार्जिंग ही वीज चाेरी ठरणार

    30-Nov-2021
Total Views |
 
 

charging_1  H x 
 
बरेच लाेकफोनवर तासन् तास बाेलतात;फोनचे चार्जिंग संपल्याचे त्यांना भानच राहत नाही. यामुळे हे लाेक ऑफीसमध्ये कामावर आले की,फोन चार्जिंगला लावतात.पण आता अमेरिकेत ऑफीस- मध्येफोन चार्जिंग करणे वीज चाेरी मानण्यात येईल, असा आदेश अमेरिकन साेशल न्यूज साईट ‘रेडिट’वर झळकला आहे.या आदेशात म्हटले आहे की, ऑफीसमध्ये माेबाइल, लॅपटाॅप इतर इलेक्ट्राॅनिक उपकरणे चार्ज करू नयेत; अन्यथा ही वीज चाेरी मानून वीजबिलाची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापून घेतली जाईल. हा निर्णय काेणत्या कंपन्याना लागू हाेणार आहे हे मात्र स्पष्ट झालेले नाही.