मकर

    30-Nov-2021
Total Views |
 
 
 

horoscope_1  H  
 
या आठवड्यात तुम्ही काेणत्याही पैलूवर तडजाेड करण्यासाठी तयार हाेणार नाहीत. वैचारिक स्पष्टतेमुळे खासगी संबंधातील खळबळ दूर हाेईल.तुम्ही लाेकांचे व परिस्थितीचे त्वरित व सटीक आकलन करण्यास समर्थ आहात, पण कामात व व्यवहारात आब राखून राहा. नाती प्रेमाने जाेपासा.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुमच्या हाती काही गाेष्टी येता येता निसटतील. याला तुमचा दृष्टिकाेन व आचरण जबाबदार असेल. ही गाेष्ट उत्तम बनवण्याची जबाबदारी तुमचीच असेल. शत्रू तुमच्यावर कुरघाेडी करण्याच्या प्रयत्नात असेल. पण त्यांना बाेलून उत्तर देण्याऐवजी कृतीतून द्यावे.
 
नातीगाेती : हा आठवडा तुमच्यासाठी नात्यांबाबत फारसा चांगला असणार नाही. तुमची चूक नसतानाही तुम्हाला चुकीसाठी जबाबदार धरले जाईल. जेव्हा वादळ घाेंगावत असते तेव्हा डाेके खाली करून ते डाे्नयावरून जाऊ देण्यातच हुशारी असते. हीच गाेष्ट या आठवड्यात समजून घ्या.
 
आराेग्य : या आठवड्यात मानसिक रूपात तुम्ही खूपच अस्वस्थ राहणार आहात. तणावामुळे तुम्हाला हृदय आणि श्वसनासंबंधित त्रासही साेसावा लागू शकताे. डाे्नयात तणाव वाढू देऊ नये. अन्यथा यामुळे तुमचे भयंकर नुकसान हाेण्याची श्नयता आहे. यासाठी ध्यानधारणा करावी.
 
शुभदिनांक : 29, 30, 02
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात इतरांवर जास्त विसंबून राहू नये. यामुळे तुमचा त्रास वाढू शकताे.
 
उपाय : आयु: प्रजां धनं धान्यं साैभाग्यं सर्वसम्पदम्। देहि देव महावृक्ष त्वामहं शरणं गतं ।। विश्वाय विश्वेश्वराय विश्वसम्भवाय। विश्वपतये गाेविन्दाय नमाे नम:।। शनिवारी या मंत्राचा जप करीत पिंपळाला प्रदक्षिणा घाला.