कर्क

    30-Nov-2021
Total Views |
 
 
 

horoscope_1  H  
 
या आठवड्यात तुम्ही एखाद्या राेमँटिक डेस्टिनेशनवर जाण्याचा प्लॅन करू शकता. जे लाेक ऑफिस साेडून बाहेर जाण्याचा विचार करीत असतील त्यांनी थाेडी सावधगिरी बाळगायला हवी. काेणत्याही खरेदीसाठी गरजेपेक्षा जास्त पैसा खर्च केल्यास तुमचे बजेट बिघडू शकते. सावध राहावे.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात कार्यक्षेत्रात तुमच्या प्रयत्नांची वाहवा हाेईल. परंतु त्याचसाेबत तुमच्यावर कामाचे बर्डनही जास्त असणार आहे.तुम्ही कामात संतुलन राखण्याचा पुरेपूर प्रयत्न कराल पण तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून हवे तसे सहकार्य लाभणार नाही. तुमचे काम तुम्हीच करायला हवे.
 
नातीगाेती : नात्यांच्या दृष्टीने तुमच्यासाठी हा एक उत्तम आठवडा ठरणार आहे.एकीकडे तुम्हाला तुमच्या माणसांचा पूर्ण सपाेर्ट मिळणार आहे तर दुसरीकडे गरज पडल्यास तुम्हाला तुमच्या नातलगांकडूनही भावनिक पाठिंबा लाभणार आहे. नाती सांभाळणे व क्षुल्लक गाेष्टी दुर्लक्षिणे तुम्हाला यायला हवे.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्ही तुमच्या तब्बेतीसाठी स्वत:ला फिट ठेवणे आवश्यक आहे. तसा तर या आठवड्यात आराेग्याबाबत काेणताही त्रास नाही पण भविष्यासाठी तुम्ही तुमच्या राेजच्या दिनचर्येत व्यायामाचा आणि फिरायला जाण्याचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे.
 
शुभदिनांक : 28, 01, 04
 
शुभरंग : पिवळा, लाल, मरून
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात अतिआत्मविश्वासाने आर्थिक बाबतीत काेणतेही माेठे पाऊल उचलू नये. त्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
उपाय : मंगळवारी भिकाऱ्याला कपडे व पैसे दान द्या. मंगळवारीच हनुमान मंदिरात हनुमान चालिसा वाचून हनुमंतासमाेर तुपाचा दिवा लावावा