मेष

    30-Nov-2021
Total Views |
 
 

horoscope_1  H  
 
या आठवड्यात तुम्हाला एखादे माेठे काम मिळण्याची श्नयता आहे. तुम्ही ज्या कामासाठी सध्या धावपळ करीत आहात ते काम यशस्वी हाेईल. त्याचे परिणाम समाधानकारक असणार आहेत. एखाद्या समारंभाच्या निमित्ताने तुम्हाला तुमच्या साऱ्या जवळच्या नातलगांना भेटण्याची संधी मिळणार आहे.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात थाेडे निराशेचे वातावरण असण्याची श्नयता आहे. तुमच्या मनात नाेकरी साेडून देण्याचाही विचार येऊ शकताे.जर व्यवसायात असाल तर तुमच्या मनात ताे बदलण्याचा विचार येईल, पण क्षणिक अपयशाने तम्ही या आठवड्यात घाबरून चालणार नाही.
 
नातीगाेती : नात्यांबाबत तुमच्या मनात चाललेला गाेंधळ अद्याप संपलेला नाही. याआठवड्यात तुम्ही ज्याच्यावर विश्वास टाकाल ताेच तुम्हाला फसवण्याची श्नयता आहे. कुटुंबातील एखादी व्य्नती नाराज हाेऊ शकते.तुम्ही त्याला एकटे साेडता कामा नये कारण तुम्ही तुमच्या कुटुंबाची महत्त्वाची कडी आहात.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला फूड पाॅइझनिंगचा त्रास सतावू शकताे.हाेता हाेईताे बाहेरचे खाणे टाळावे.घरातील पाैष्टिक आहार घ्यावा. खाण्या- पिण्याबाबत नियमितपणा ठेवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे दिनचर्येत व्यायामाचा समावेश करावा. तसेच रात्री उशिरापर्यंत जागणे टाळावे.
 
शुभदिनांक : 28, 01, 04
 
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात इतरांचे विचार ऐकून घेणे तुमच्यासाठी गरजेचे असेल. तुमच्याकडील उत्तम विचार त्यामुळे भक्कम हाेतील.
 
उपाय : या आठवड्यात मंगळवारी हनुमंतापुढे तेलाचा दिवा लावावा.मंगळवारी व शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसा वाचावी व नैवेद्य दाखवून गरीबांना प्रसाद वाटावा.