एकटेपणातून तरुणांना कसे बाहेर पडता येईल?

    30-Nov-2021
Total Views |
 
 

aloneness_1  H  
 
नात्यांकडे बघण्याची मानसिकता बदलत चालली आहे. वेगाने बदलणारे तंत्रज्ञान, शिक्षणाचा वाढता परीघ, जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे बदलणारी नाती आणि त्याचबराेबरीला वाढत जाणारी व्यक्तीकेंद्रितता या सगळ्या गुंत्यात माणसांच्या एकटेपणात भर पडत चालली आहे. त्यातूनच माणसाला असहाय्य वाटू लागले आहे.
 
1. बदल स्वीकारा : आपल्यासाेबत आपल्या आजूबाजूची माणसे, परिसर आणि परिस्थिती नेहमी बदलत असते. या बदलाला आपण स्वीकारले पाहिजे. बदल ही सगळ्यात सकारात्मक गाेष्ट आहे. आपणजसे कधीच लहान राहत नाही दरराेज माेठे हाेत राहताे, कालचे आज आपण कधीच नसताे, हे स्वीकारता आले पाहिजे.
 
2. आभासी विश्वापासून दूर व्हा : सतत साेशल नेटवर्कवर राहणारे लाेक आभासी विश्वात राहत असतात; पण प्रत्यक्षात मात्र ते एकाकी असतात. अशावेळी त्यांना असहाय्य वाटू लागते. हा एकाकीपणा घालवण्यासाठी ते स्वत:ला या विश्वात अधिकच गुरफटून देतात; पण वेळीच सावध व्हा. नेटवरच्या चॅटिंगपेक्षा प्रत्यक्ष जिवंत माणसाला भेटणे आणि बाेलणे जास्त उपकारक असते. तुम्ही या दाेघांत याेग्य तारतम्य बाळगू शकलात तर तुम्हाला कधीही असहाय्य वाटणार नाही.
 
3. स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय : आपल्याला मागच्या काळाच्या तुलनेत शिक्षणाच्या, काम करण्याच्या, कुठेही बाहेर फिरायला जाण्याच्या अधिक संधी आहेत, तरीही मग असहाय्य का वाटते? म्हणूनच नेमके काय म्हणजे आपण स्वतंत्र आहाेत, याचा विचार करणे गरजेचे आहे. स्वत:च्या स्वातंत्र्याची तुम्हाला नेमकी आणि स्पष्ट कल्पना येऊ शकली, तर तुम्हाला कधीही असहाय्य वाटणार नाही.
 
4. स्पर्धेला नकार द्या : या रॅट रेसमध्ये आपल्याला काेण धावायला सांगते आहे, याचा जरा विचार करा. आपण सर्वांत पुढे असलेच पाहिजे, ही सक्ती आधी बाजूला करा. माेठमाेठाली ध्येये आणि स्वप्न बघण्याच्या नादात अनेक जणांचे जगणेच राहून जाते, असे लाेक राजवाड्याएवढा बंगला बांधतात; पण त्यातही त्यांना असहाय्यच वाटते.
 
5. सुखाची व्याख्या बदलून पाहा : आपल्या प्रेमाच्या माणसांसाेबत आनंदाने चार घास खाणे, विनाअपेक्षा एखाद्याला मदत करणे, निसर्गाजवळ राहणे, एकांताचा आनंद घेता येणे यातदेखील सुख असते ते शाेधता आले पाहिजे. मटेरियलीस्टिक गाेष्टींपलीकडे तुम्ही सुख शाेधू शकलात, तर तुम्हाला कधीही असहाय्य वाटणार नाही.
 
6. घाबरणे बंद करा : आपल्या आजूबाजूचे जे अशांत आणि अस्थिर वातावरण आहे त्या सगळ्याला आपणच कारणीभूत आहाेत.
सततचा भाैतिक गाेष्टींचा हव्यास, स्पर्धा, ईर्षा यातून हे सर्व आलेले आहे. विशेष म्हणजे हे सगळे घाबरण्यामुळे हाेते आहे.
दुसरा आपल्यापुढे जाईल, ही सतत भीती आपल्या सगळ्यांमध्ये पसरली आहे. ही भीती आधी दूर केली पाहिजे. स्वत:वर आणि समाेरच्या माणसाच्या माणुसकीवर श्रद्धा ठेवली पाहिजे, ही श्रद्धा जर आपण ठेवू शकलाे, तर आपल्याला असहाय्य वाटणार नाही.