चांगल्या झाेपेसाठी आजमावा अँटी स्नाेरिंग उषी

    27-Nov-2021
Total Views |
 
 

sleep_1  H x W: 
 
 
घाेरण्याची समस्या त्रासदायक वाटत नाही, पण हे आराेग्यासाठी नुकसानकारक आहे. यापासून बचाव करण्यासाठी अँटी स्नाेरिंग उषीचा वापर करणे फायदेशीर ठरते.झाेप आणि आराेग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. चांगल्या आणि भरपूर झाेपेनंतर आपण जेव्हा जागे हाेताे, तेव्हा खूप ताजंतवानं आणि उत्साही वाटते. हा सगळ्या चांगल्या झाेपेचा करिश्मा आहे.झाेप आपल्या थकलेल्या मेंदूला आणि शरीराला नवी ऊर्जा देते.यामुळे आपण एका नव्या उत्साहासह नव्या दिवसाला सामाेरे जाताे.
 
व्यापक समस्या : सामान्यतः असं बघायला मिळतं की, घाेरण्याच्या समस्येमुळे झाेपेत अडथळा निमार्ण हाेताे. भारतात बहुतांश लाेक घाेरण्याच्या समस्येने ग्रस्त आहेत.घाेरणं केवळ झाेपणाऱ्या व्य्नतीला त्रस्त करतं असं नव्हे तर शेजारी झाेपणाऱ्या व्य्नतीलाही त्रास हाेताे.यामुळे झाेपण्याचं वातावरण खराब हाेतं. आजूबाजूच्या व्य्नती घाेरणाऱ्या व्य्नतीपासून दूर जाऊ लागतात. जसं व्य्नतीचं वय वाढतं, तशी घाेरण्याची समस्या वाढते. अशावेळेस अँटी स्नाेरिंग उशी खूप सहाय्यक ठरते.
 
कारणं काय? : वैद्यकीय शास्त्रानुसार, अशा व्य्नतींची संख्या खूप जास्त आहे, ज्या घाेरतात.त्यांच्या गळा आणि नाकामध्ये पेशींची संख्या अधिक असते.ज्यांना सामान्यतः फ्लाॅपी पेशी असं म्हणतात. घाेरण्याच्या समस्येने ग्रस्त व्य्नती स्लीप एप्निया किंवा अनिद्रेच्या समस्येने ग्रस्त असतात.अशावेळेस अँटी स्नाेरिंग उशी खूप सहाय्यक ठरते.
 
उपाय : या समस्येवरील उत्तम उपाय म्हणजे अँटी स्नाेरिंग उषीचा वापर करणे. अँटी स्नाेरिंग उषीमध्ये विशिष्ट डिझाइन आणि हवेने भरलेला एक राेलर असताे. यामुळे व्य्नती कुशीवर झाेपते. परिणामी झाेपेत येणाऱ्ता अडचणी कमी हाेतात. तसंच चांगली झाेप येण्यास मदत हाेते.
 
वापर करण्यास साेयीस्कर : ही उशी एका अ‍ॅडजेस्टेबल पाऊचसह मिळते. त्यामुळे आपण या उशीतील हवा आपल्याला हव्या त्या प्रमाणात कमी-जास्त करू शकताे. म्हणजेच अँटी स्नाेरिंग उशी प्रत्येकासाठी फायदेशीर ठरते.