तुमच्याकडे स्वप्न नसेल, तर ते सत्यात कसे उतरेल?

    27-Nov-2021
Total Views |
 
 
 
dreams_1  H x W
 
तुम्ही आत्ता जे काही करत आहात त्यामुळे तिची स्वप्ने वास्तवात पूर्ण हाेऊ शकतात का, याचा नेहमी विचार करा.
1. तुम्ही एखादी गाेष्ट का करता, हे अधिक महत्त्वाचं असते. कारण याचा संबंध थेट तुमच्या स्वप्नांशी असताे.
2. तुमची स्वप्नं हीच तुमच्या प्रेरणेचे इंधन असते.
3. तुम्ही जेव्हा दुसऱ्यांसाठी काम करता तेव्हा दुसऱ्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी काम करता; पण जेव्हा स्वत:साठी काम करता तेव्हा स्वत:च्या स्वप्नपूर्तीसाठी काम करत असता.
4. ज्याच्यासाठी काम करावेसे वाटेल, भांडावेसे वाटेल असे स्वप्न तुमच्याकडे असायला हवे.
5. नेहमीच स्वप्नकेंद्री आणि ध्येयास्नत राहा.
6. बरीचशी लाेकं त्यांच्या उत्पनाला अनुसरून स्वप्ने पाहतात. कारण त्यांची स्वप्नं पूर्ण करण्याचा कुठलाच मार्ग त्यांच्याकडे नसताे.
7. स्वप्ने पाहायला घाबरू नका.
8. तुम्ही जाेपर्यंत तुम्हाला नेमकं काय हवं आहे ते शाेधून काढणार नाही, ताेपर्यंत तुम्हाला स्वप्न पाहता येणार नाही.