माती खाल्ल्यामुळे मुलांमध्ये र्नताची कमतरता निर्माण हाेते

    26-Nov-2021
Total Views |
 
 
 

child_1  H x W: 
मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मनाेवृत्ती दिसतात. ही मनाेवृत्ती शारीरिक आणि मानसिक आजारांचा संकेत असते. कधी कधी असं हाेतं की, मुलांच्या सामान्य सवयी, खूप माेठ्या आजारांना बळी पडतात. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने केलेल्यासंशाेधनानुसार, मुलांची अंगठा चाेखणे, नखं चावणे, माती खाणे, झाेपताना दात खाणे, अंथरुण ओले करणे, ताेतरं बाेलणे, खूप दंगा करणे, चिडणे, हट्ट करणे, परीक्षेच्या वेळेस पाेटात दुखणे किंवा डाेके दुखणे असा बहाणा यांसारख्या सवयी हे स्पष्ट करतात की, मुलांच्या पालन-पाेषणात काहीतरी कमी पडत आहे.
 
डाॅक्टरांच्या मते, निम्न वर्ग आणि मध्यम वर्गातील छाेटी मुलं ज्यांना माती खाण्याची सवय असते, त्यांच्या पालन-पाेषणात कुठे ना कुठे कमतरता हे स्पष्ट हाेते. जर ही सवय लवकर दूर केली नाही तर मुलांच्या शरीरात रक्ताल्पता निर्माण हाेऊ शकते. तसंच मानसिक विकारही निर्माण हाेतात. या अध्ययनात समाविष्ट साधारण 37.4 टक्के मुलांमध्ये रक्ताल्पता आणि डाेकेदुखीची सम स्या आढळली. या अध्ययनातून हा निष्कर्ष हाती लागला आहे की, ज्या मुलांमध्ये माती खाण्याची सवय आढळते, ती मुलं व्यवस्थित अभ्यास करू शकत नाहीत.
 
बालराेगतज्ज्ञांच्या मते, साधारण 20 टक्के मुलं या समस्येने पीडित असल्याचे आढळले. मुलांमध्ये डाेकेदुखीची समस्या अधिक आढळते. जर वेळीच याचं निदान झालं नाही तर डाेकेदुखीची समस्या म ायग्रेनला कारणीभूत ठरते. एका संशाेधनात आढळले की, साधारण 25 टक्के मुलांमध्ये पाेटदुखीची समस्या सतावते. जी शारीरिक कारणांमुळे नसून मानसिक कारणांमुळे हाेते. मातीच्या सेवनाने आहारात जाे लाेह घटक असताे, ताे मातीद्वारे शाेषला जाताे.ज्यामुळे शरीरात हिमाेग्लाेबीन कमी हाेते. तसंच रक्ताल्पता निर्माण हाेते. आपल्या देशात साधारण 30 लाख मुलं या सवयीने ग्रस्त आहेत.