सिंगापूरच्या वाणिज्यदूतांची गृहमंत्र्यांशी भेट

    24-Nov-2021
Total Views |
 

singapore_1  H  
 
सिंगापूरचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली.सायबर क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी हे सर्वांसाठी माेठे आव्हान आहे. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पाेलिस नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.सायबर गुन्हेगारी आणि फाॅरेन्सिक सायन्स या अनुषंगाने महाराष्ट्र पाेलिसांना सहकार्य मिळावे, तसेच उभय देशांतील संबंध अधिक वृद्धिंगत व्हावेत, अशी अपेक्षा वळसे-पाटील यांनी व्यक्त केली.महाराष्ट्र पाेलिसांना पाेलिसिंगसाठी आवश्यक त्या सर्व सहकार्यासाठी प्रयत्नशील राहू. लसीकरण पूर्ण झालेल्या प्रवाशांसाठी पुढील आठवड्यात सिंगापूर विमानसेवा सुरू हाेत आहे. यासाठीही मुंबई पाेलिसांचे सहकार्य मिळावे, असेही चेओंग मिंग फूंग यांनी सांगितले. यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित हाेते.