या कारमध्ये हाेता गाेल्फ काेर्स अन् स्विमिंग पूल

    24-Nov-2021
Total Views |
अमेरिकन ड्रीम कार 100 फूट लांबीची हाेती
 

car_1  H x W: 0 
 
 
 
जर तुम्हाला वाहनांची आवड असेल, तर साहजिकच तुम्हाला कधीतरी असा प्रश्न पडला असेल, की जगातील सर्वाधिक लांबीची कार काेणती आहे, ती कशी असेल, जगातील सर्वांत लांब कारमध्ये काेणत्या सुविधा असतील आणि इतर अनेक प्रश्न तुमच्याही मनात आले असतीलच.जगातील सर्वात लांबीची कार अमेरिकन ड्रीम कार म्हणून ओळखली जाते.1986 मध्ये, ही कार जगातील सर्वात लांब कार म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नाेंदली गेली. अमेरिकन ड्रीम कारची लांबी 100 फूट हाेती, जी एखाद्या टायर असलेल्या ट्रेनसारखी दिसत हाेती.त्या कारमध्ये असलेल्या सुविधांमुळेही ती सर्वांच्या आकर्षणाचा विषय हाेती.
 
कारच्या वर वैयक्तिक हेलिपॅड, मिनी गाेल्फ काेर्स आणि स्विमिंग पूल हाेता. याशिवाय कारमध्ये बाथटब, जाकूझी, टीव्ही, फ्रिज, टेलिफाेन या सुविधाही हाेत्या. इतकंच नाही तर कारमध्ये एका वेळी 70 लाेक बसू शकत हाेते. अमेरिकन ड्रीम कारला एकूण 26 चाके हाेती आणि ती दाेन्ही बाजूंनी चालवता येत हाेती.विशेष बाब म्हणजे ती काेणत्याही कार निर्माता कंपनीने बनवली नाही. त्याचे डिझायनर जे. ओहरबर्ग हाेते. जे. ओहरबर्ग हा हाॅलिवूड चित्रपटांचा सुप्रसिद्ध वाहन डिझायनर हाेता आणि त्याला कारची आवड हाेती. त्यांनी ही कार 1980मध्ये 1976च्या कॅडिलॅक एल्डाेराडाे लिमाेझिनवर आधारित बनवली हाेती. कारच्या दाेन्ही बाजूंना 8 इंजिन बसवण्यात आलं हाेतं. ही कार तयार हाेण्यासाठी आणि प्रत्यक्ष रस्त्यावर येण्यासाठी जे. ओहरबर्गला सुमारे 12 वर्षे लागली.