दाढीने 63 किलाे वजन उचलण्याचा विक्रम

    24-Nov-2021
Total Views |
 
 
अँटानसच्या डाेळ्यात वेदना आणि चेहऱ्यावर समाधान
 
 
lifting_1  H x
 
 
काेणी आपल्या दाढीच्या मदतीने 63 किलाे वजन उचललं, तर त्या व्यक्तीची काय अवस्था हाेईल, याचा विचारही करवत नाही. मात्र या वेदनाही आनंदात बदलल्या जेव्हा अँटानस काेंट्रिमासने आपल्या नावावर वर्ल्ड रेकाॅर्ड नाेंदवले.अँटानस यांच्या दाढीचे केस इतके मजबूत आहेत, की 63 किलाे वजन उचलूनही ते तुटले नाहीत. मात्र, हे वजन उचलताना त्यांच्या डाेळ्यांमध्ये वेदना स्पष्ट दिसत हाेत्या.अँटानस नावाच्या या व्यक्तीच्या कृतीचा व्हिडीओ गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. त्यात एक व्य्नती दाढीने 63.80 किलाेग्रॅमचं सर्वात जड वजन उचलताना लाईव्ह पाहायला मिळते. त्याच्या डाेळ्यांमध्ये वेदनांबराेबरच समाधानही असल्याचे दिसते. त्यांनी 63 किलाे वजन असलेल्या महिलेल्या आपल्या दाढीच्या सहायाने उचलून संपूर्ण जगालाच अचंबित केलं.
 
हा व्हिडीओ पाहून सगळेच शाॅक झाले आहेत.साेशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल हाेत आहे. एका यूजरनं यावर कमेंट करत म्हटलं, ही व्यक्ती काेणत्या हेअर प्राेडक्ट्सचा वापर करत असेल माहिती नाही. याशिवाय इतरही अनेकांनी कमेंट करत या व्यक्तीचं काैतुक केलं. याआधी एका महिलेनं आपल्या बायसेप्सने दहा सफरचंद फाेडत जागतिक रेकाॅर्ड बनवला हाेता. या व्हिडीओनंही लाेकांचं लक्ष वेधलं हाेतं.अँटानस यांच्या या कृतीमुळे जगभरातील हेअर प्राॅड्नटसचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे लक्ष वेधले गेले आहे. केसांकडे सर्वाधिक लक्ष देणारी जगभरातील तरुणी पिढीही हा व्हिडीओ शेअर करीत आहे. अँटानस याच्या केसांच्या ताकदीबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्तहाेत आहेत. काही युजर्संनी या विक्रमाबद्दल शंकाही व्यक्तकेल्या आहेत.