हिवाळ्यातील अस्वस्थतेवर मात करता येते

    23-Nov-2021
Total Views |
 
 
 

winter_1  H x W 
हिवाळा सुरू झाल्यामुळे हवा थंड झाली असून, दिवस लहान हाेऊ लागला आहे. या वातावरणात काहींना अस्वस्थता येते, ते बेचैन हाेतात, उत्साह संपताे. याला म्हणतात ‘सिझनल अ‍ॅफे्निटव्ह डिसऑर्डर’ (एसएडी-सॅड). बदललेल्या हवामानामुळे हाेणारा त्रास असे त्याचे वर्णन करता येईल. हा त्रास असलेल्यांना हिवाळ्याचा काळ कंटाळवाणा ठरताे.त्रासाची ही लक्षणे तात्पुरती असली, तरी दर तीनमागे एकाला संपूर्ण हिवाळ्यात ‘सॅड’चा त्रास हाेताे. याची लक्षणे साैम्य ते तीव्र अशा स्वरूपाची असतात. मूड उदास हाेणे, उत्साह आणि आनंद वाटत असलेल्या कामांमधील रस जाणे, खाण्याच्या सवयीत बदल हाेणे (नेहमीपेक्षा जास्त खाणे), झाेपेचे वेळापत्रक विस्कळीत हाेणे (नेहमीपेक्षा जास्त झाेपणे) आणि सगळे काही निरर्थक असल्याची भावना निर्माण हाेणे ही याची नेहमी आढळणारी लक्षणे आहेत.
 
‘सॅड’ हा विकार कशामुळे उद्भवताे याबाबत अद्याप माहिती मिळाली नसली, तरी त्याची कारणे गुंतागुंतीची आणि बहुपरिणामी असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मेंदूतील ‘हायपाेथॅलॅमस’ या भागाचे कार्य बिघडल्यामुळे हा विकार हाेत असल्याचे काही संशाेधकांना वाटते. (आपला मूड, भाेजन आणि निद्रा यांच्या जैविक क्रियांचे नियंत्रण या भागातून हाेते).दुसऱ्या एका दाव्यानुसार, ‘मेलाटाेनिन’ नावाचे संप्रेरक अतिप्रमाणात स्रवल्यामुळे हा त्रास हाेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. (आपल्या झाेपण्या-उठण्याच्या वेळा या संप्रेरकामुळे नियंत्रित हाेत असतात आणि मेंदूतील ‘पिनिअल ग्लँड’मधून या संप्रेरकाची निर्मिती हाेते).आपले जैविक लय (सर्केडियम िऱ्हदम) विस्कळीत झाल्यामुळेही असे घडत असल्याचे तिसरा एक सिद्धांत सांगताे. आपल्या झाेपण्या-उठण्याबराेबर या लयीचा संबंध असताे.
 
हिवाळा संपून वसंत ऋतूच्या आगमानाची चाहूल लागताच, या परिस्थितीत बदल हाेत असल्याचे काहींना जाणवते. मात्र, हिवाळ्यात त्यांना वैताग आलेला असताे. पण म्हणून निराश हाेण्याचे कारण नाही. कारण ‘सॅड’चा त्रास हाेत असलेल्यांसाठी काही उपाय तज्ज्ञांनी सांगितले आहेत. समुपदेशन किंवा मानसाेपचार तज्ज्ञांबराेबर बाेलणे हा त्यातला एक आहे. आपली संज्ञानात्मक जाणीव वाढून नैराश्यावर मात करण्यासाठी संवाद हा प्रभावी मार्ग असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे याेग्य ठरते. ‘काॅग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी’ (सीबीटी) नैराश्यावर मात करण्यास उत्तम असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. ‘लाइट थेरपी’पेक्षा ‘सीबीटी’चे उपचार जास्त प्रभावशाली असतात.‘लाइट थेरपी’मध्ये संबंधित व्यक्तीला प्रखर प्रकाश देणाऱ्या एका बाॅ्नसपुढे किंवा बाॅ्नसखाली 20-30 मिनिटे बसविले जाते.हा उपचार राेज केला जाताे. त्याचाही फायदा हाेत असल्याचे दिसले आहे. ‘सीबीटी’मध्ये रुग्णावर बाेलण्याबराेबरच ‘बिहेवियरल अ‍ॅ्निटव्हेशन’द्वारेही उपचार केले जातात.
 
रुग्णाला आवडणाऱ्या गाेष्टी करण्यास त्याला उत्तेजन दिले जाते. त्यात एखाद्या छंदाचाही समावेश असताे. त्यातून त्याचे नैराश्य दूर केले जाते. पण याव्यतिरिक्त काही साधे उपायही करता येतात.‘सॅड’चा त्रास असलेल्यांना बाहेरच्या माेकळ्या हवेत फिरणे फायदेशीर ठरते.नैसर्गिक प्रकाशात फिरल्यामुळे मूड सुधारताे आणि नैराश्य कमी हाेते. त्यामुळे असा त्रास हाेत असलेल्यांनी जास्तीत जास्त वेळ नैसर्गिक प्रकाशात राहावे. नियमित व्यायाम आणि सुयाेग्य आहाराचे तंत्र सांभाळले तर हा त्रास कमी हाेताे.
व्यायामामुळे तुमचे शारीरिक आराेग्य सुधारण्याबराेबरच मानसिक आराेग्यही चांगले राहते. त्याला याेग्य आहाराची जाेड द्यावयास हवी. हिवाळा काहींना चांगला वाटताे, तर काहींना त्रासदायक; पण याेग्य उपायांमुळे ‘सॅड’च्या त्रासापासून लांब राहता येईल, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.