विचार वाचू शकणारी ‘ब्रेन काॅम्प्युटर इंटरफेस टेक्नोलोजी

    23-Nov-2021
Total Views |
 
 
’ संध्यानंद.काॅम
 

rtechnology_1   
 
ज्या लाेकांचे हात निष्क्रिय आहेत, ते आता केवळ विचार करून लिहू शकतात. हे वायरलेस ब्रेन इम्प्लांट तुमच्या विचारांना 94% अचूकपणे वाचू शकते.ब्रेन-काॅम्प्युटर इंटरफेस टेक्नोलोजीव्य्नतीच्या विचारांना वाचू शकते आणि त्यांना काॅम्प्युटर स्क्रीनवर अक्षरांमध्ये प्रकटही करू शकते. नेचर नियतकालिकात प्रकाशित रिपाेर्टनुसार ब्रेनगेट नावाच्या या रिसर्चमध्ये हाताने काही लिहिण्याच्या वेळी मेंदूत हाेणाऱ्या हालचालींना आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे वाचण्यात आले. या दरम्यान हाय-बँडविड्थ न्यूरल सिग्नल देण्यात सक्षम वायरलेस ट्रांसमीटरला डाे्नयावर लावण्यात आले. 65 वर्षांच्या अशा एका व्य्नतीवर प्रयाेग केला, जाे अनेक वर्षांपासून पॅरालिसिसची शिकार आहे.प्रयाेगादरम्यान त्यांनी फ्नत मेंदूचा वापर करून अशी कल्पना केली की, ते पेनने एका पेपरवर अक्षरे लिहीत आहेत.परीक्षणांमध्ये 94 ट्नके अचूकतेसह 90 अक्षरे दर मिनिट वेगाच्या गतीने त्यांनी लिहिली. त्यांच्या विचारांची अचून नाेंद काॅम्प्युटरवर झाली.