वांद्र्यात उभारणार साैरऊर्जा प्रकल्प पर्यावरणपूरक उपक्रमांवर देणार महापालिका भर

23 Nov 2021 16:46:08
 
 

solar_1  H x W: 
 
जागतिक स्तरावर पर्यावरणावर झालेले अनिष्ट परिणाम, जागतिक तापमानवाढ, प्रदूषण, मुंबईतील वाढती दूषित हवा आदींच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेने अधिकाधिक पर्यावरणपूरकतेकडे वाटचाल सुरू केली आहे. पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने आणि पारंपरिक पद्धतीच्या विजेवरील खर्चात कपात करण्यासाठी साैरऊर्जे चा पर्याय स्वीकारला जात आहे.त्यासाठी मुंबई महापालिकेच्या विविध ठिकाणच्या आस्थापनांत छाेट्या आकाराचे साैरऊर्जा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
त्याची सुरुवात वांद्र्यातील पंपिंग स्टेशनमध्ये 230 किलाेवाॅट क्षमतेचा साैरऊर्जा प्रकल्प उभारून करण्यात येणार आहे.मुंबईच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणपूरक आराखडा आखला जात आहे. त्यासाठी पालिकेकडून पर्यावरणपूरकतेसाठी अधिक लक्ष दिले जात आहे. प्रदूषणासह विविध घटकांचा विचार करून पर्यावरणपूरक संकल्पना मध्यवर्ती ठेवण्यात येत आहे. विकासकामे करताना त्यात पर्यावरणाच्या अनुषंगाने विचार केला जात आहे. त्याचप्रमाणे, पालिकेकडून पारंपरिक वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य दिले जात आहे.त्यापूर्वी बेस्ट उपक्रमातही सीएनजी बससह इलेक्ट्रिक बस समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0