नाती जाेपासताना प्रायव्हसी सांभाळणे महत्त्वाचे

    23-Nov-2021
Total Views |
 
 
 
संध्यानंद.काॅम
 

privacy_1  H x  
 
काय सांगावे यापेक्षा काय सांगू नये हे समजणे जीवनात सर्वांत महत्त्वाचे असते. यशस्वी आणि समाधानी जीवन त्यावर अवलंबून असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.पण, हे सगळ्यांना जमतेच असे नाही.सध्याच्या काळात तर आपल्या खासगी बाबींवरही मुक्तपणाने बाेलण्याची सवय वाढल्याचे दिसते.संवाद महत्त्वाचा असला, तरी काय बाेलावे आणि काय नाही याचे तारतम्य प्रत्येकाने सांभाळायला हवे. एका परिस्थितीचा विचार करू. जाेडीदार त्याच्या मित्र किंवा मैत्रिणीबराेबर बाेलत असल्याच्या आवाजामुळे तुम्हाला जाग आल्यावर तुम्ही काय कराल? पहाटे चार वाजता ती किंवा ताे काेणाबराेबर बाेलत असावा अशी शंका प्रथम तुम्हाला येईल.कदाचित तुमचा जाेडीदार त्याचे स्पष्टीकरणसुद्धा देईल. पण, अशा अवेळी ती किंवा ताे का बाेलत हाेता ही शंका तुमच्या मनात उरेलच.
 
अशा प्रकारच्या गुप्त अथवा खासगी संवादामुळे तुमच्या जाेडीदाराच्या मनात संशयाचे बीज पेरले जाऊन त्याच्या निष्ठेविषयी तुम्ही साशंक हाेता. त्यातून तुमचे संबंध बिघडण्याची भीती असते. आता प्रश्न येताे ताे अशी गुप्तता का बाळगली जाते आणि ती असावी का, हा.बंगळुरूमधील एका पटकथालेखकाने असा अनुभव घेतला आहे.सध्या ते मुंबईच्या चित्रपटसृष्टीत काम करतात. ते म्हणतात, ‘माझ्या कामाच्या स्वरूपामुळे माझ्या जीवनात नाट्यच घडले. त्यातून मी बरेच काही शिकलाे.लाेकांना नेहमी सत्य माहिती हवी असली, तरी बहुतेक वेळा ती स्वीकारण्याची त्यांची तयारी नसते. माझ्या मैत्रिणीच्या संशयी स्वभावामुळे तिच्याबराेबरचे नाते तुटले. तिला माझ्या कामाच्या वेळा पसंत नव्हत्या आणि माझ्या कामाच्या स्वरूपामुळे माझ्याभाेवती नेहमी सुंदर मुली-महिला असल्यामुळे ती नाराज राहत हाेती. मी तिचा संशय दूर करण्याचा प्रयत्न करूनही उपयाेग झाला नाही.
 
अखेर आम्ही वेगळे हाेण्याचा निर्णय घेतला.’ जाेडीदार अथवा दाम्प्त्यांनी स्वत:ची काही गुपिते आपल्याजवळ ठेवणे सहजीवनासाठी चांगले असल्याचे मत मुंबईतील मानसाेपचारतज्ज्ञ डाॅ. सागर मुंदडा यांनी व्यक्त केले. त्यामुळे सहजीवन निराेगी स्वरूपाचे राहत असल्याचे ते सांगतात. ते म्हणतात, ‘आपसांतील संबंध किती स्थिर आणि दृढ आहेत यावर दाम्पत्ये त्यांची छाेटी आणि माेठी गुपिते एकमेकांपासून लपवतात. पण काही वेळा सांगण्याची कला नसल्यामुळेही गुपिते जपली जातात.’ संवाद हा काेणत्याही नात्याचा पाया असताे. त्यातून जाेडीदारांचा परस्पर विश्वास दृढ हाेताे.
 
अशी स्थिती असलेल्या जाेडीदारांमध्ये गुपिते जपण्यामुळे फायदा हाेऊ शकताे. पण खासगीपणा आणि गुप्तता यातील फरक लक्षात घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, की जाेडीदारांचा परस्परांच्या समानतेवर विश्वास असेल, तर काही समस्या येत नाही. काेणाचे नुकसान हाेणार नाही अथवा गैरसमज हाेणार नाही असे वागणे म्हणजे ‘खासगीपणा’ असताे.तुमच्या संबंधांवर परिणाम हाेऊ शकेल अशा गाेष्टी न बाेलणे चांगले.काॅम्प्युटरचा पासवर्ड, बँकेचे पिन नंबर, तुमच्या व्यवसायातील ग्राहकाचा खासगीपणा जपण्यासाठी त्याचे तपशील न देणे हे याेग्य असल्यामुळे ते तुमच्या जवळच हवेत. पण काही वेळा जाेडीदारांना त्याचीच माहिती हवी असते. काॅर्पाेरेट क्षेत्रातील एका माजी महिला वकिलाला त्यांच्या पतीबाबत असा अनुभव आला. त्या म्हणतात, ‘माझा माजी पती व्यावसायिक हाेता.
 
एका कंपनीचे काम मी करत असताना, त्या कंपनीच्या विलीनीकरणाबाबत त्याला माहिती हवी हाेती. पण असे करणे म्हणजे वकील-अशील यांच्यातील विश्वासाचा भंग झाला असता.मी हे सांगूनही त्याला ते पटले नाही. या घटनेनंतर माझ्या मनात त्याच्याविषयीचा आदर उरला नाही.’ दिवसातील प्रत्येक मिनिटाचा हिशेब तुम्ही द्यायला लागलात तर ते ओव्हर शेअरिंग ठरेल. एकमेकांच्या सहवासात सुरक्षितता वाटायला हवी, मूल्यमापनाची भीती असू नये असेही डाॅ. मुंदडा म्हणतात. जाेडीदारांबाबत त्यांनी एकमेकांना काय सांगावे आणि काय नाही याचे काही निकष नसतात. एकमेकांचा खासगीपणा जपा, सन्मान द्या आणि न