आता महिला केवळ गृहलक्ष्मी, गृहिणी नसून त्यांचा आता स्वतःचे घर, प्राॅपर्टी खरेदी करण्याकडे वाढता कल आहे. विशेषतः काेराेनाच्या पहिल्या लाटेनंतर प्राॅपर्टीत गुंतवणूक करणाऱ्या महिलांची संख्या 57 ट्न्नयांवरून 62 ट्न्नयांवर पाेहचली आहे.अॅनाराॅक प्राॅपर्टी कन्सल्टंटने नुकत्याच केलेल्या सर्व्हेतून हे निष्पन्न झाले आहे.वेगवेगळ्या शहरातील 3 हजार व्य्नतींचा या सर्व्हेमध्ये समावेश हाेता. त्यात 36 ट्नके महिला हाेत्या. यापैकी बहुतेक महिलांनी घर खरेदी करण्याची इच्छा व्य्नत केली. एकूण महिलांपैकी 82 ट्नके महिलांनी सांगितले की, त्या स्वतः कमावलेल्या पैशांतून घर खरेदी करण्याची याेजना आखत आहेत. तर 18 ट्नके महिलांना गुंतवणूक म्हणून घर खरेदी करायचे आहे, असे सांगितले.तर पुरुषांनी प्राॅपर्टी खरेदी करून फ्लॅट भाड्याने देऊन किंवा भविष्यात किंमत वाढल्यावर विकण्यासाठी प्राॅपर्टी खरेदी करायची असल्याचे सांगितले.
केवळ 15 ट्नके पुरुषांनी स्वतः राहण्यासाठी घर खरेदी करायचे असल्याचे सांगितले बहुतेक महिला 90 लाखांपर्यंत, तर 5 ट्नके महिला अडीच काेटी रुपयांचे ल्नझरी फ्लॅट खरेदी करण्यासाठी उत्सुक हाेत्या. आजकाल महिलांना रेडी टू मुव्ह, रेडी पझेशन घर खरेदी करणे पसंत असते. स्वतः बचत केलेली र्नकम किंवा कर्ज घेऊन घर खरेदी करण्याची बहुतेक महिलांची इच्छा असते. पण, त्यांना घर त्वरित हवे असते. जेणेकरून नव्या घरात लगेच राहायला जाता येईल.महिलांनी घर खरेदी करावे यासाठी सरकारी याेजनासुद्धा आहेत. अशा स्थितीत महिलांच्या नावावर म्हणजेच आई, पत्नी, वा बहीणीच्या नावावर रजिस्ट्रेशन करणे फायद्याचे असते. याशिवाय प्राॅपर्टी खरेदी करणारी महिला असेल, तर स्टॅम्प ड्युटी कमी लागते. पण, ही सवलत प्रत्येक राज्यांत वेगवेगळी असते.