गॅसेसच्या औषधांचं अतिप्रमाणात सेवन यकृतासाठी धोक्याचे

    23-Nov-2021
Total Views |
 
 

kidney_1  H x W 
 
काही लाेकांना सतत गॅसेसची समस्या हाेते. या समस्येपासून मुक्ती मिळविण्यासाठी ते गॅसेसच्या औषधाचं खूप प्रमाणात सेवन करतात. तुम्ही सुद्धा अशा व्यक्तींपैकी एक असाल तर सावध व्हा. कारण दिल्लीतील डाॅ्नटरांनी नुकतीच एक चेतावणी दिली आहे की, खूप जास्त प्रमाणात औषधांचं सेवन करण्याने परिणाम विरुद्ध घडतात. यामुळे केवळ यकृतावर परिणाम हाेताे असे नाही तर किडनी प्रत्याराेपण करण्याची समस्याही निर्माण हाेऊ शकते.
 
ज्या व्यक्ती गॅसेसच्या समस्येपासून मुक्ती मिळविण्यासाठी औषधांचं सेवन करतात, त्यांच्या या सवयीमुळे पाेटातील अ‍ॅसिडची पातळी कमी हाेते. सतत औषधं खाणं टाळा. अन्यथा शरीराला गंभीर आजारांमुळे नुकसान हाेऊ शकतं.याबाबतीत आहारतज्ज्ञ म्हणतात की, पाेटातील वाईट बॅ्नटेरियांना नाहीसं करण्यासाठी अ‍ॅसिड आवश्यक आहे. अतिप्रमाणात औषधांचं सेवन करण्याने ताेंडातून पाेटात पाेहचणाऱ्या संसर्गाची जाेखीम वाढते. परिणामी यकृतावर खूप वाईट परिणाम हाेताे. एवढंच नाही, गॅसेसच्या औषधांचं अधिक प्रमाणात सेवन करण्याने यकृताबराेबरच हाडावरही परिणाम हाेताे.