काेयना धरणाचा तिसरा टप्पा आणि पायथा वीजनिर्मिती प्रकल्प खासगी तत्त्वावर (बीओटी) दिला जाणार असून, जलसंपदा विभागाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.काेयना धरण राज्यातील सर्वात माेठे धरण आहे. काेयना धरणाला महाराष्ट्राची वरदायिनी म्हणूनही संबाेधले जाते.पावसाळ्यात काेयना धरण भरले, की याचा आनंद राज्यातील सर्वसामान्यांना हाेताे. याच धरणातून राज्यातील अनेक जिल्ह्यांचा पिण्याच्या पाण्याचा, तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटताे. राज्याच्या विजेचा प्रश्नही हेच धरण साेडवते.धरणाच्या पाण्यावरून निर्माण हाेणारी वीज गेली कित्येक वर्षे राज्याला प्रकाशमान करत राज्याच्या गरजा भागवत आहे.
ही वीज महानिर्मितीमार्फत तयार केली जात हाेती. आता यापुढे काेयना धरणाचा तिसरा टप्पा आणि पायथा वीजनिर्मिती प्रकल्प खासगी तत्त्वावर दिला जाणार आहे. गेली 35 वर्षे हा करार महावीजनिर्मितीकडे हाेता.भाडे तत्त्वावर दिल्या गेलेल्या या प्रकल्पाला 35 वर्षे पूर्ण झाल्यानंतर भाडेपट्टा रक्कम मिळणे बंद झाले हाेते. त्यानंतर हा प्रकल्प पुन्हा जलसंपदा विभागाच्या ताब्यात घेऊन आता तिसरा टप्पा आणि पायथा वीजनिर्मिती प्रकल्प बाेओटी तत्त्वावर देण्याचे मंजूर झाले आहे.जलसंपदा विभागाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. राज्यातील 35 वर्षे पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे नूतनीकरण, आधुनिकीकरण आणि परिचालनासाठी निविदा मागवल्या जाणार आहेत. राज्यातील आणखी चार प्रकल्पही जलसंपदा विभागाकडे हस्तांतरित केले जाणार आहेत.