अमेरिकेतील हूवर धरणाजवळ वस्तू जमिनीवर पडत नाहीत, तर तरंगतात!

    23-Nov-2021
Total Views |
 
 
संध्यानंद.काॅम
 

america_1  H x  
 
खाली टाकलेल्या वस्तू वर तरंगतात, असे कुठे दिसते? पण अमेरिकेतील धरणावर हे घडून येत आहे...अमेरिकेच्या हूवर धरणावर गुरुत्वाकर्षण श्नती नसल्यासारखीच आहे. या कारणाने पाणी किंवा इतर वस्तू खाली येण्याऐवजी वर तरंगत राहतात.याचे कारण धरण बांधण्याची पद्धत आहे. ते धनुष्याकारात बांधले आहे, या कारणाने काेणतीही वस्तू उडविल्यानंतर ती धरणाच्या भिंतीला धडकून हवेत उडू लागते. धरणाच्या भिंतीवरून काहीही खाली फेकल्यानंतर ते खाली येत नाही, तर वरच तरंगत राहते.हूवर धरण अमेरिकेच्या नेवाडा आणि अ‍ॅरिझाेना प्रांतातील सीमेवर काेलाेराडाे नदीवर बांधण्यात आले आहे.
 
प्रत्यक्षात हूवर धरणाच्या बांधकामामुळे त्याच्या आजूबाजूला ग्रॅव्हिटी वा गुरुत्वाकर्षण जवळपास शून्य आहे. खाली पडण्याऐवजी वस्तू वर तरंगत राहण्याचे दृश्य एखाद्या सायन्स फ्निशन मूव्ही प्रमाणे दिसते.हूवर धरण आपल्या या वैशिष्ट्यामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. या धरणाची लांबी सुमारे 379 मीटर आहे, तर उंची सुमारे 221 मीटर आहे. धरणाच्या पायाची रुंदी सुमारे 200 मीटर आहे.सर्वसाधारण भाषेत सांगायचे झाले, तर त्याची लांबी-रुंदी फुटबाॅलच्या दाेन स्टेडियमइतकी आहे. या धरणाची निर्मिती 1931 ते 1936च्या दरम्यान झाली हाेती.त्याचे नाव अमेरिकेचे 31वे अध्यक्ष हर्बर्ट हूवर यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. या धरणाला दरवर्षी लाखाे पर्यटक भेट देतात.