वृषभ

    22-Nov-2021
Total Views |
 
 

horoscope_1  H  
 
हा आठवडा तुमच्यासाठी उतम असणार आहे. तुम्ही तुमच्या मित्रांसाेबत वा तुमच्या प्रिय व्यक्तीसाेबत एखाद्या टूरवर जाण्याची याेजना बनवू शकता. तुम्ही स्वत: काही नवे शिकाल व तुमच्या साेबतच्या लाेकांनाही काही नवे शिकवण्याचा प्रयत्न कराल. खर्च वाढेल त्यामुळे त्यावर लक्ष द्यावे. कार्यकुशलतेमुळे तुम्ही आघाडीवर राहाल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्याच्या सुरुवातीच्या भागात तुम्ही तुमच्या प्राेफेशनल प्रगतीकडे जास्त लक्ष द्याल. जे विदेशात, मल्टीनॅशनल कंपनीत वा आयात-निर्यातीत काम करीत आहेत त्यांच्यासाठी सुरुवात उत्तम राहील. जड मशिनरी, तेल, कंसल्टंसी, स्पेससंबंधित मशीनरीच्या कामात थाेडा संघर्ष राहील.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्राेफेशनल बाबींकडे जास्त लक्ष द्याल त्यामुळे राेमान्सकडे तुमचे लक्ष कमी असेल. पण यासाठी उत्तरार्ध उत्तम आहे. तुमचे मन चंचल राहिल्यामुळे तुमचे नात्यांकडे कमी लक्ष असेल.तरीही या आठवड्यात तुमच्या नात्यांत संतुलन राखू शकाल. विवाहितांसाठी सामान्य सप्ताह.
 
आराेग्य : या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही उत्तम आराेग्यसुख मिळवाल आणि कामात उत्साहाने पुढाकार घ्याल. तुम्हाला कदाचित अस्वस्थता व निद्रानाशाची समस्या असू शकते. तुम्ही काहीसे थकल्यासारखे राहाल, त्यामुळे नियमित शेड्यूलमधून ब्रेक घेणे पसंत कराल. ज्यामुळे नंतर तरतरीत राहाल.
 
शुभदिन : 21, 24, 25
 
शुभरंग : भुरा, हिरवा, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात खाणेपिणे सांभाळावे. तसेच बाहेरचे खाणे टाळावे.
 
उपाय : श्रीगणेशाला पांढऱ्या फुलावर अत्तर लावून 9 दुर्वांसह अर्पण करावे व पांढऱ्या लाडवांचा नैवेद्य अर्पण करावा