प्रयत्नांसाेबतच आणखीही काही गाेष्टी कराव्यात

    22-Nov-2021
Total Views |
 
 

success_1  H x  
  • आपण सतत नवनव्या गाेष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असायला हवं. ज्या गाेष्टी आपल्याला माहिती आहेत, त्याची सखाेल माहिती घ्यायला हवी. जी गाेष्ट आपल्याला मुळीच माहिती नाही, त्याबद्दलची उत्सुकता आपल्या मनात कायम जागृत असली पाहिजे.
  • प्रत्येक गाेष्ट जी आपण ऐकताे, ती आपल्यासाठी उपयुक्त आहे का, हे जसं आपण जाणून घेताे, तसंच त्या विषयाचा खाेलात जाऊन आणखीही काही माहिती समजून घेण्याचा आवर्जून प्रयत्न करायला हवा.
  • नवीन माहिती ही सहजासहजी कधीच मिळत नाही.उपलब्ध हाेत नसतेच. त्यासाठी आपल्याला प्रश्न विचारता आले पाहिजेत. सतत प्रश्न विचारणं आणि ते याेग्य शब्दात विचारणं, त्यातून आपल्या शंकेचं समाधान करून घेता आलं पाहिजे.
  • आपल्याला जी माहिती मिळते, ती परिपूर्ण आहे, असं मानून किंवा गृहीत धरून जे लाेक पुढे वाटचाल करतात, त्यांना अनेक अडथळे येण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला उपयु्नत असलेला प्रत्येक विषय समजून घेण्यासाठी, आपल्यातलं कुतूहल सतत जागरूक ठेवलं पाहिजे.