वृश्चिक

    22-Nov-2021
Total Views |
 
 

horoscope_1  H  
 
या आठवड्यात तुमच्यावर गूढ रहस्यवाद व आध्यात्मिकेचा रंग चढेल. यामुळे या विषयात खाेलवर उतरण्याचा प्रयत्न कराल. नवे काम करण्यासाठी प्रेरित व्हाल.तुमचे मन प्रसन्न राहील. छाेटा प्रवास संभवताे. जर तुम्ही तुमच्या वाणीवर संयम ठेवाल तर पुढील बरेच अनर्थ टळतील.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात नाेकरदारांचा परफाॅर्मन्सउत्तम राहील. घंद्याशी निगडित लाेकांना बाजारातील स्पर्धेत थाेडा तणाव असेल, पण नाेकरदार स्वत:वर साेपवलेली कामे उत्साहाने पार पाडून वरिष्ठांचे मन जिंकून घेऊ शकतात.उत्तरार्धात आपण बढती वा नव्या नाेकरीची अपेक्षा बाळगू शकता.
 
नातीगाेती : हा आठवडा नात्यांसाठी सामान्य असेल प्रेमसंबंधात तुम्ही ओतप्राेत बुडालेले असाल. पूर्वीची एखादी समस्या असेल तर त्यातही टप्प्याटप्प्याने सुधारणा हाेईल. तुम्ही तुमच्या खास मित्रांच्या संपर्कात जास्त राहाल. तसे तर तुम्ही कुटुंबाकडेही लक्ष द्याल पण पहिल्या दिवशी एकाकीपणा जाणवेल.
 
आराेग्य : या आठवड्यात प्रवास करताना वा हिंडता-फिरताना थाेडे लक्ष ठेवायला हवे. छाेट्या-माेठ्या गाेष्टी लक्षात ठेवल्यास तुम्ही उत्तम आराेग्य मिळवू शकता. डायबेटीस आणि स्थूलतेवर विशेष नियंत्रण ठेवावे. अखेरच्या दिवशी पूर्वीपेक्षा तब्बेतीत खूपच सुधारणा हाेईल आणि फ्रेश वाटेल.
 
शुभदिन : 22, 23, 27
 
शुभरंग : पिवळा, लाल, गुलाबी
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात माेसमी आजारांपासून जपावे. तळकट व जड अन्न टाळावे.
 
उपाय : या आठवड्यात 108 दुर्वांवर ओली हळद लावून श्री गजवक्रम नमाे नम: चा जप करीत श्रीगणेशाला वाहाव्यात.