धनू

    22-Nov-2021
Total Views |
 
 
 

horoscope_1  H  
 
या आठवड्यात तुमची चिंतनश्नती व आध्यात्मिक शक्तीही उत्तम राहील. उपहार आणि पैसा मिळेल. प्रफुल्लतेने आठवडा घालवाल. आध्यात्मिकतेचा आश्रय घेऊन वैचारिक नकारात्मकताााा दूर करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्यासाठी हा आठवडा आशा वाढवणारा ठरणार आहे. तुमच्या काही गुप्तयाेजना यशस्वी हाेतील.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुम्ही एखादी महत्त्वाची मीटिंग वा चर्चा करू शकता. उच्च अधिकाऱ्यांशी काेणत्याही प्रकारच्या संवादात शब्दांत उग्रता येणार नाही यावर लक्ष द्यावे. नाेकरदार अखेरच्या दाेन दिवसांत उत्तम परफाॅर्मन्स देऊ शकतात.
तुम्ही हुशारीने प्राेफेशनल आघाडीवर मार्ग बनवू शकता.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्हाला तुमचे प्रेमसंबंध संथ गतीने पुढे जाताना आढळतील. ही स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही एकमेकांना जास्त वेळ द्यायला हवा.साेबतच डिनर वा लाँग ड्राइव्हवर जाऊ शकता. प्रेम व्यक्त करताना शब्दांमध्ये साैम्यता राखावी. विवाहितांसाठी हा आठवडा मध्यम आहे.
 
आराेग्य : हा आठवडा आराेग्याच्या दृष्टीने उत्तम राहील पण ज्यांना दातदुखी वा हिरड्यांच्या समस्या, नाक, कान,घशाचा त्रास असेल त्यांनी सध्या थाेडी काळजी घ्यायला हवी. प्रवासात दुखापत हाेणार नाही असे पाहावे. अखेरच्या दाेन दिवसांत थकव्यामुळे अशक्तपणा जाणवू शकताे.
 
शुभदिन : 22, 26, 27
 
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात त्वचेसंबंधित त्रास वा अ‍ॅलर्जी हाेण्याची श्नयता आहे त्यामुळे दक्षता बाळगावी.
 
उपाय : या आठवड्यात श्रीगणेशाला राेज लाडवांचा नैवेद्य दाखवा. यामुळे श्रीगणेश सर्व इच्छा पूर्ण करील.