लाेकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या सॅडफिशिंगमध्ये वाढ

    22-Nov-2021
Total Views |
 
 
संध्यानंद.काॅम
 

sadfishing_1  H 
 
मानवी भावनांमध्ये सहानुभूतीचाही समावेश हाेताे. एखाद्याच्या अडचणीच्या काळात आपण त्याच्याबराेबर सहानुभूतीने वागताे, त्याला सांभाळून घेताे; पण काही वेळा आपला हेतू साध्य करण्यासाठीसुद्धा अशी वर्तणूक केली जाते. फेसबुक अथवा इन्स्टाग्रामच्या फीडच्या माध्यमातून तुम्ही ब्राउज करत असल्याची कल्पना करा. अचानक तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या पाेस्ट दिसायला लागतात.
आपले व्य्नितगत आयुष्य आणि मानसिक आराेग्याबाबतच्या या पाेस्ट असतात. त्या वाचल्यावर तुम्ही काळजी कराल की त्या पाेस्टची सत्यता तपासून पाहाल? या पाेस्ट खऱ्या आहेत की केवळ लाेकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आहेत, हे तुम्हाला कसे कळणार? ही शंका येण्याचे रास्त कारण म्हणजे ‘सॅडफिशिंग’. ऑनलाइनमध्ये हा प्रकार वाढत असून, लाेकांची सहानुभूती मिळविण्यासाठी यात लाेक आपल्या समस्या अतिरंजित स्वरूपात मांडतात.
 
सेलिब्रिटीही त्याला अपवाद नाहीत आणि त्याचे उदाहरण म्हणजे कॅनडातील गायक जस्टिन बिबर. त्याने अनेक चुका केल्या आहेत आणि त्याला आपली मानसिक स्थिती जबाबदार असल्याचा त्याचा दावा आहे.जस्टिनने 2019मध्ये एक इन्स्टाग्राम पाेस्ट टाकून त्यात मानसिक तणाव, जीवनातील चढउतार आणि नातेसंबंधांबाबत माहिती दिलीहाेती. या पाेस्टवर प्रतिक्रिया लगेच आल्या. ही पाेस्ट म्हणजे आपल्या जीवनातील समस्या जाहीर करून सहानुभूती मिळविण्याचा ‘सॅडफिशिंग’चा प्रकार असल्याची टीकाही काहींनी केली; पण खराेखरच ती व्यक्ती दु:खी आहे की केवळ चर्चेत राहण्यासाठी ती असे करते आहे, हे कळणे अशा पाेस्टबाबत श्नय नसते; पण प्रसिद्ध व्यक्तीही आपल्या खासगी जीवनाबाबत साेशल मीडियावर उघड पाेस्ट करायला लागतात तेव्हा गाेंधळ हाेताे.
 
हा शब्द चर्चेत कसा आला? ‘सॅडफिशिंग’ हा काही नवा शब्द नाही. ब्रिटिश माॅडेल रिबेका रिड हिने प्रथम त्याचा वापर केला हाेता. लाेकांचे लक्ष आपल्याकडे वेधले जाईल, अशी संवेदनशील पाेस्ट लिहिणे असा या शब्दाचा अर्थ असल्याचे रिबेका सांगते; पण काही वेळा नैराश्य किंवा तणावाबाबत सुरू असलेल्या चर्चेचा उल्लेखही ‘सॅडफिशिंग’ असा केला जाताे.काही वेळा कसलाही विचार न करता लाेक आपल्या खासगी जीवनाबाबत साेशल मीडियावर पाेस्ट टाकतात आणि दुसरे लाेक त्याला मीठमसाला लावून चर्चा करत असल्याचेही दिसते.
 
अशा पाेस्ट वाढवितात तणाव: नैराश्याबराेबर झुंजणाऱ्यांवर ‘सॅडफिशिंग’चा आराेप केल्यावर ते जास्तच तणावाखाली जातात. गरज असताना कुटुंबीय आणि मित्रांची साथ न मिळाल्याने असे लाेक जास्तच खचतात. ‘सॅडफिशिंग’ करणारी व्यक्ती खराेखरच समस्यांबराेबर झुंजत असू शकते.‘हिस्ट्राॅनिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर’चा विकार असलेले लाेकही इतरांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी अशा पाेस्ट करतात. लाेकांची सहानुभूती मिळविण्यासाठी असे लाेक काेणत्याही थराला जाऊ शकतात; पण त्यांना ती मिळाली नाही, तर ते जास्तच निराश हाेतात.
 
किशाेरवयीनांवर जास्त परिणाम: मुलांमधील किशाेरवयीन अवस्था फार नाजूक असते. या वयात मुली-मुले स्वत:ची ओळख सिद्ध करण्याच्या प्रयत्नांत असतात. त्यासाठी ही तरुणाई साेशल मीडियावर जास्त वेळ घालवून आपली माहिती इतरांना देतात व ‘स्टेटस अपडेट’च्या नादात अनेकदा भावनेच्या भरात ही मुले आपले वैय्नितक अनुभवही शेअर करतात; पण त्यामुळे भविष्यात धाेका उद्भवू शकताे. आपले मूल तणावात असल्याचे पालकांनी ओळखायला हवे आणि त्यासाठी सावध राहणे गरजेचे आहे. गरज भासल्यास समुपदेशनाची मदतही घेणे आवश्यक ठरते.
 
जाहीर चर्चा नकाे: ‘सॅडफिशिंग’पासून दूर राहणे श्नय असल्याचे ‘इमाेशनल डिटाॅ्नस फॅसिलिटेटर’ गीता बुद्धराजा यांनी सांगितले. त्या म्हणतात, की ‘सॅडफिशिंग’ करणाऱ्यांना काही व्य्नितगत समस्या असू शकतात. अशा व्यक्ती स्वप्रेमी (नर्सिसिस्ट) असल्यास त्यांना सदैव लाेकांचे लक्ष वेधून घेण्याची सवय असते आणि त्यातून त्या एक साधन म्हणून ‘सॅडफिशिंग’चा वापर करतात. अशा व्यक्ती साेशल मीडियाचा वापर पर्सनल स्पेससारखा करतात. आपल्या व्य्नितगत समस्यांवर व्य्नितगत चर्चेतूनच मार्ग निघू शकताे, हे भावनेच्या भरात ‘सॅडफिशिंग’ करणाऱ्या व्य्नतींनी लक्षात ठेवायला हवे.