मीन

    22-Nov-2021
Total Views |
 
 
 

horoscope_1  H  
हा आठवडा तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने खूप उत्तम आहे. तुमच्यामध्ये धाडस वाढेल तसेच तुमच्यातील रिस्क घेण्याची प्रवृत्ती जागी हाेईल. तुम्ही एखादी माेठी रिस्क घ्याल आणि माेठा लाभ कमवाल. समाजातील माेठ्या लाेकांच्य ओळखी हाेतील व त्याचा जीवनातील सर्व क्षेत्रांत फायदा हाेईल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुम्हाला काही अडचणींचा सामना करण्याची तयारी ठेवावी लागेल. नाेकरदारांना पहिल्या काही दिवसांत वरिष्ठांशी तणाव हाेण्याची श्नयता आहे. त्यांच्या रागामुळे तुमची कामावरील छबी डागाळू शकते. यावेळी काेणत्याही बेकायदेशीर कामांपासून दूर राहावे.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही प्रेमसंबंधात खूप मग्न राहाल. विवाहित परस्परांना खूप चांगल्या प्रकारे ओळखू शकतील व एकमेकांना जबाबदारी पार पाडण्यास मदत करतील. अनुरूप जाेडीदाराच्या शाेधात असणाऱ्या विवाहेच्छुकांना याेग्य जाेडीदार मिळू शकताे.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या तब्बेतीकडे लक्ष द्यायला हवे.विशेषकरून पहिल्या तीन दिवसांत अ‍ॅसिडिटी, अपचन, रक्तदाब, हृदयाची अनियमित धडधड, त्वचाराेग, बद्धकाेष्ठता, घशात जळजळ वा वेदना, कफ अशा समस्या तुम्हाला घेरू शकतात. ग्रहस्थिती बदलल्यानंतर आराम मिळेल.
 
शुभदिन : 22, 23, 27
 
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात चुकीची गुंतवणूक केल्यास आर्थिक हानी संभवते.त्यामुळे यात घाईगडबड करू नये.
 
उपाय : या आठवड्यात पिवळ्या धाग्यात पिवळे फूल आणि दुर्वा ओवून हार बनवून श्रीगणेशाला अर्पण करावा व हरभरा डाळ व गूळ श्रीगणेश मंदिरात दान करावा.