सिंह

22 Nov 2021 16:42:47
 
 
 

horoscope_1  H  
हा आठवडा तुमच्यासाठी मध्यम फलदायी असणार आहे. सारे काही आपल्या वेळेनुसार हाेत असते पण काही गाेष्टींसाठी वाट पाहावी लागते. यावेळी तुम्हाला सर्वांत जास्त गरज आहे ती धैर्य राखण्याची. तुम्हाला सारे भराभर व्हावे असे वाटत असते. पण तुमची इच्छा असूनही ते लवकर हाेऊ शकत नाही.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात नाेकरदार आपल्या उत्त्म वेळेनुसार व वरिष्ठांच्या कृपेने पुढे जाऊ शकतात. नव्या नाेकरीसाठी संधी मिळू शकतात.भागीदारीच्या व संयु्नत उद्याेगात सांभाळून काम करायला हवे. आठवड्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही जास्त चंचल असाल अशावेळी सांभाळून निर्णय घ्यावेत.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुमचे प्रेमसंबंध एकूणच उत्तम राहणार आहेत, पण विवाहितांना एकमेकांविषयी थाेडी चिंता राहू शकते. जाेडीदाराला जास्त वेळ द्यायला हवा. काेणतीही शंका असेल तर तिचे शांतपणे निरसन करावे लागेल.पूर्वीपासून प्रेमसंबंधात असाल तर आपसातील भावना उत्तम असेल.
 
आराेग्य : या आठवड्यात आराेग्य चांगले राहण्यासाठी तुम्ही खूप लक्ष द्यायला हवे. विशेषकरून हृदयाची अनियमित धडधड, दातदुखी, हिरड्यांसंबंधित समस्या, मज्जातंतूसंबंधित त्रास, निद्रानाश, आळस इ.ची श्नयता आहे. तुमचे वागणे एखाद्याला खूप विचित्र वाटण्याची श्नयता नाकारता येत नाही.
 
शुभदिन : 22, 24, 27
 
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात काेणत्याही आजाराच्या उपचारात आळस वा बेपर्वाई करू नये.
 
उपाय : या आठवड्यात गुळाच्या 11 गाेळ्या बनवून श्रीगणेशाला अर्पण करा.यामुळे तुमच्या सर्व मनाेकामना पूर्ण हाेतील.
Powered By Sangraha 9.0