मानवी शरीरातील हाडांची रचना व त्यांचे कार्य किती गुंतागुंतीचे आहे. काही अवयवांची रचना ही एका हाडाची तर काही दुहेरी हाडांची आहे. पण त्यामुळे नेमकं काय हाेतं की त्याच्या या विशिष्ट रचनेमुळे आपण आपल्या आयुष्यातली आपली कामे सुरक्षितपणे पार पाडू शकताे.मनुष्याच्या हाताचा वरचा भाग म्हणजे दंड, एकाच हाडापासून बनलेला आहे. तर काेपरापासून पुढे मनगटापर्यंत दाेन हाडे आहेत. पायाच्या बाबतीतही तसंच, पायाचा वरील भाग म्हणजे मांडींला एकच हाड आहे. तर गुडघ्यापासून तर पुढे अगदी घाेट्यापर्यंत दाेन हाडे आहेत, असं का आहे?
मानवी शरीर म्हणजे उत्क्रांती आहे. या शारीरिक उत्क्रांतीमुळेच आपण अवघड कामेही करू शकताे.आपल्या शरीरात हाडांची जाेडणी असलेले अनेक सांधे आहेत. जे आपलं कार्य करीत असतात. त्यातील काही मजबूत आहेत.ज्याद्वारे आपण शारीरिक हालचालींची काही कामे सहज करू शकताे. तर काही मात्र कमकुवत आहेत, तरीही यामुळे मु्नत हालचाल करणे साेपे जाते.अशा रचनेमुळेच आपण हात वर-खाली, तसेच उठणे बसणे करू शकताे. आपल्या काेपरापासून पुढे मनगटापर्यंत आणि गुडघ्यापासून घाेट्यापर्यंत मात्र दाेन हाडे असतात. जी सरळ दिशेत असतात. अशाप्रकारच्या जाेडणीमुळे गाेलाकार फिरणं, घसरणे अशा हालचाली साेप्या हाेतात.