मिथुन

    22-Nov-2021
Total Views |
 
 

horoscope_1  H  
 
हा आठवडा तुमच्यासाठी समृद्धीकारक ठरणारा आहे, पण आठवड्याची सुरुवात काहीशी कमकुवत राहणार आहे. तुम्हाला एखाद्या ज्ञानी व्य्नतीचे सान्निध्य लाभेल. जे तुम्हाला तुमचे जीवन बदलणारा एखादा सल्ला देईल. तुम्ही तुमच्या कामाला जास्त महत्त्व द्याल. ज्यामुळे तुमची प्रतिमा उजळेल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात कामकाजात जास्त उत्साह राहील.तुम्ही वेगाने प्रगती करण्यासाठी इच्छुक असाल. त्यामुळे कदाचित कामात जास्त उतावळे व्हाल व आपली कामे वेगाने पूर्ण करू शकाल. नाेकरदार स्वत:च्या कल्पनाश्नती व ज्ञानाद्वारे लक्ष्य गाठू शकतील. नवे करार करण्याची घाई करू नये.
 
नातीगाेती : या आठवड्यात काही कारणांमुळे थाेड्या चढ-उतारात वेळ जाणार आहे. दीर्घकाळपर्यंत तुमच्या जाेडीदाराच्या अहंकाराचा सामना करावा लागणार आहे. पहिल्या दिवशी नात्यांकडे पाठ फिरवणे पसंत काल. ज्यांचे जाेडीदार दूर आहेत ते कम्युनिकेशन वा भेटीद्वारे संपर्क ठेवू शकतात.
 
आराेग्य : या आठवड्यात स्वत:च्या तब्बेतीकडे थाेडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे काम करणे सुरुवातीला कठिण जाणार आहे. जादा जेवणामुळे, प्रवासामुळे वा दिनचर्या बदलल्यामुळे पाेटाचा त्रास संभवताे. तशी उत्तरार्धात स्थिती सुधारून तुम्ही खूपच अ‍ॅ्निटव्ह राहाल.
 
शुभदिन : 21, 24, 25
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात अतिआत्मविश्वासाने सारी कामे स्वत:करू इच्छाल.याेग्य ठिकाणी इतरांचे सहकार्य घ्यायला हवे.
 
उपाय : या आठवड्यात श्रीगणेशाची कृपा हाेण्यासाठी दुर्वांचा हार बनवून ॐ श्री गं गणपतये नम: मंत्र 108 वेळा उच्चारून श्रीगणेशाला घालावा.