5 काेटी खेकड्यांचे बेट

    22-Nov-2021
Total Views |
 
 

crabs_1  H x W: 
 
ऑस्ट्रेलियामध्ये एका मैदानात एकाच वेळी लाखाे खेकडे जमा झाल्यामुळे या मैदानाला बेटाचे स्वरूप आले आहे. हे खेकडे ओक्टोबर नाेव्हेंबर महिन्यात ख्रिसमस बेटावरून समुद्राकडे दरवर्षी जात असतात.हे खेकडे जंगलातून नॅचरल पार्क समुद्रात संववनकाळासाठी (प्रजननकाळ) साठी बेटावरून समुद्रात जातात. यावर्षी तब्बल 5 काेटी खेकड्यांचा समूह बेटावरून खाली उतरून समुद्राकडे जाऊ लागल्याने ख्रिसमस बेट आणि रस्ता लाल रंगाने माखल्यासारख्या दिसत आहे.
 
या खेकड्यांनी रस्तेच नव्हे, तर पूल, खडक आणि बांधकामाची जागाही व्यापली आहे. या खेकड्यांनी लाेकवस्तीत प्रवेश करू नये, यासाठी स्थानिक प्रशासन दरवर्षी अतिर्नित तात्पुरते पूल बांधते. बॅरियर (कठडे) लावते पण गेल्या 15 वर्षांत इत्नया माेठ्या संस्थेने खेकडे जमा झाले नव्हते. त्यामुळे यावर्षी या कराेडाे खेकड्यांना मार्ग उपलब्ध करून देण्याचे प्रशासनासमाेर माेठे आव्हान आहे.
समुद्रात खेकड्यांची प्रत्येक मादी 5-6 दिवसांत 1 लाख अंडी टाकून काेट्यवधी खेकड्यांना जन्म देत असतात. यानंतर हे खेकडे पिल्लांसह समुद्राकडून ख्रिसमस बेटाकडे प्रयाण करतात.