या आठवड्यात भावनेच्या भरात ज्यामुळे नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल असे काेणतेही पाऊल उचलू नका. कामाच्या ओझ्यापासून मुक्ती मिळेल व तुमच्यावर जाे तणाव कुरघाेडी करीत हाेता ताे आता कमी हाेईल.तुमच्या अनेक रखडलेल्या याेजना वेग घेतील. एखादे नवे तंत्रज्ञान शिकाल.
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात सजावटी वस्तू, माैजमजेच्या वस्तू इ.च्या कामात असाल तर यश लाभेल. एखादा नवा उद्याेग सुरू करू शकता.सरकारी कामकाज व्यवस्थितपणे पूर्ण हाेईल. नाेकरदारांना कामकाजात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कुटुंबाकडून लाभ मिळेल. थाेडे श्रम हाेतील पण लाभही तितकाच हाेईल.
नातीगाेती : या आठवड्याची सुरुवात उत्तम असेल आणि बहुतेक वेळ तुमच्या मनात खास व्यक्तीविषयी आकर्षण राहील. विवाहितांनी विशेष करून आपल्या नात्यात स्वामित्वाची भावना साेडून समर्पणाची भावना वाढवायला हवी. एखाद्याला प्रपाेज करू इच्छित असाल तर शब्दांत स्पष्टपणा ठेवावा.
आराेग्य : या आठवड्यात आराेग्यासंबंधीत काेणतीही माेठी समस्या दिसून येत नाही. तुमच्या चेहऱ्यावर तेज आणि शरीरात जाेम राहील. पूर्वीची एखादी समस्या असेल तर त्यापासून दिलासा मिळू शकताे. तरीही पहिल्या दिवशी नाक, कान, घशाची एखादी समस्या जाणवू शकते.
शुभदिन : 21, 24, 25
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
शुभवार : बुधवार, शुक्रवार शनिवार
दक्षता : या आठवड्यात बाेलताना वाद वाढणार नाही, याची दक्षता घ्या.
उपाय : दुर्वा व लाल रंगाच्या फुलाला अत्तर लावून श्री गणेशाय नम: जप करीत श्रीगणेशाला अर्पण करा. यामुळे सर्व संकटे टळतील