कर्क

    22-Nov-2021
Total Views |
 
 

horoscope_1  H  
 
हा आठवडा तुम्ही सामाजिक कार्यात आणि मित्रांसाेबत घालवाल. तुमच्या मित्रमंडळीत नवीन मित्र येतील. मित्रांसाठी तुमच्याकडून खर्च केला जाईल.ज्येष्ठ व्य्नतींकडून फायदा हाेईल. तसेच त्यांचे सहकार्यही लाभेल. अचानक धनलाभामुळे मानसिक प्रसन्नता वाढेल. दूरस्थ नातलगांकडून शुभवार्ता समजेल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्राेफेशनल प्रगतीकडे जास्त लक्ष द्याल. जे विदेशात, बहुद्देशीय कंपनीत वा आयात-निर्यातीसंबंधित व्यवसायात कार्यरत असतील त्यांच्यासाठी हा आठवडा उत्तम असणार आहे.कामकाजात अचानक बदल करावासा वाटेल. पण ते सध्या टाळावे.
 
नातीगाेती : नात्यांबाबत एकीकडे तुम्ही खूपच भावुक आहात तर दुसरीकडे नात्यांतून तुम्ही आनंदी नसल्यामुळे इतरांना दुखवालही. या आठवड्यात तुम्ही तुमच्या बाेलण्यातून अनेकांची मने दुखावू शकता. त्यामुळे लहानसहान गाेष्टींकडे दुर्लक्ष करणे व नात्यांत संतुलन राखणेच उत्तम ठरेल.
 
आराेग्य : या आठवड्यात तब्बेतीसंबंधी काही समस्या उद्भवू शकतात.ज्यांना पूर्वीपासून पायांच्या सांध्यासंबंधित समस्या असतील त्यांनी त्याकडे लक्ष द्यायला हवे. त्याचप्रमाणे तुम्हाला काहीशी अस्वस्थता जाणवू शकते. तसेच निद्रानाशाचा त्रासही संभवताे. अशावेळी कामातून वेळ काढून विश्रांती घ्यावी.
 
शुभदिन : 22, 23, 27
 
शुभरंग : पिवळा, लाल, मरून
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात तब्बेत थाेडी कमजाेर राहील. यासाठी खाण्या- पिण्याकडे लक्ष द्यावे.
 
उपाय : या आठवड्यात श्रीगणेशाला माेदकाचा व लाेण्याचा नैवेद्य दाखवावा.यामुळे मनाेकामना पूर्ण हाेतील.