मेष

    22-Nov-2021
Total Views |
 
 

horoscope_1  H  
 
हा आठवडा तुमच्यासाठी मध्यम स्वरूपात फलदायी राहणार आहे. तुम्हाला काही नवीन गाेष्टी जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. ज्या तुमच्या कामाच्या संदर्भात जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक असणार आहे. यामुळे तुम्ही तुमच्या कामात अधिक चांगली सुधारणा करू शकाल. आर्थिक स्थिती सुधारेल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात सुरुवातीला तुम्ही दूरच्या कामांमध्ये, आयात-निर्यात, मल्टीनॅशनल कंपनीत नाेकरी इ.त उत्तम परफाॅर्मन्स देऊ शकाल. तुमचा बहुतेक वेळ तुम्ही प्राेफेशनल कामात दिल्यामुळे तुम्हाला दीर्घकालीन फायदा हाेऊ शकताे. शाॅर्टकटने पैसा कमावण्यासाठी शेअरबाजार इ.चा आधार घेऊ नये. सरकारी काँट्रॅ्नटच्या कामात थाेडा त्रास राहील.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या प्रेमसंबंधात सुधारणा हाेईल. हे संबंध सात जन्माच्या बंधनात बदलण्याबाबत तुम्ही गंभीर असाल. तुमच्या दाेघांमध्ये राेमँटिक विचार आणि आपसातील पारदर्शकता असेल. दांपत्यजीवनात परस्परांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी संयुक्त रूपात सहकारी व्हाल.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्ही तुमच्या तब्बेतीकडे विशेष लक्ष द्यायला हवे.माेसमी आजारांसाेबतच कंबरदुखी, डाेळ्यांची जळजळ, सांधे व स्नायूंमध्ये त्रास, बद्धकाेष्ठता, दृष्टी मंदावणे, रक्ताभिसरणाच्या समस्या हाेऊ शकतात.त्यामुळे आराेग्याबाबत जेवढे सावध राहाल तेवढे उत्तम ठरेल.
 
शुभदिन : 22, 23, 27
 
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केल्यामुळे धनहानी संभवते. यासाठी घाईगडबड टाळावी.
 
उपाय : या आठवड्यात राेज 11 दुर्वा हळदीच्या पाण्यात टाकून श्रीगणेशाला अर्पण कराव्यात.