कुंभ

    22-Nov-2021
Total Views |
 
 

horoscope_1  H  
 
या आठवड्यात नशिबावर अवलंबून न राहता तुम्हाला स्वत:ला प्रयत्न करायला हवेत आणि आळस झटकायला हवा. कारण तुमच्यामध्ये आळस वाढत आहे.तुम्ही वादविवादात व खटल्यात यशस्वी राहाल. तुम्ही एखादा नवा काेर्स जाॅइन करू शकता. सहकर्मचारी व इतरांशी बाेलताना सावध राहावे.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुम्ही प्राेफेशनल कामांमध्ये उत्साहाने पुढे जाल आणि सुरुवातीपासूनच तुमची याेजना उत्तम असेल.तुम्ही सध्या जे प्रयत्न कराल ते तुम्हाला भविष्यात खूप माेठा लाभ मिळवून देणार आहेत. जन्मभूमीपासून दूर राहून काम करणाऱ्यांना हा काळ खूपच उत्तम आहे.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्यात संबंधाबाबत अनिश्चितता जाणवत असेल आणि एखाद्या किरकाेळ गाेष्टींवरून तणाव हाेऊ शकताे. अशावेळी स्थिती धैर्याने नियंत्रणात घ्यावी लागेल. उत्तरार्धात विशिष्ट पात्रासाेबत जवळीक वाढू शकते. विवाहेच्छुकांना मनपसंत जाेडीदार मिळू शकताे.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला शरीरात थाेडा थकवा आणि सुस्ती जाणवत असेल तर नियमितपणे व्यायाम करण्यास सुरुवात करा. डायबिटीस आणि स्थूलतेची तक्रार असेल तर महिन्याच्या शेवटी थाेडी सुघारणा दिसू लागेल.काेणतीही माेठी समस्या नाही पण प्रवासात धावपळ करू नका.
 
शुभदिन : 21, 24, 25
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात खाण्या-पिण्यात दक्षता बाळगावी. तळकट तेलकट पदार्थ टाळावेत..
 
उपाय : या आठवड्यात राेज हत्तीला माेदक वा गूळभाकरी खाऊ घालावी व श्रीगणेशाला 108 दुर्वा वाहाव्यात ज्यामुळे तुमची अडलेली कामे पूर्ण हाेतील.