माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरू हाेणार

    20-Nov-2021
Total Views |
 
 

matheran_1  H x 
 
साैंदर्याने नटलेल्या माथेरान या पर्यटन स्थळात हातरिक्षा बंद हाेऊन लवकरच ई-रिक्षा सुरू हाेणार आहेत. या संदर्भात केंद्र सरकारच्या सनियंत्रण समितीसाेबत चर्चा करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे.या चर्चेच्या फलश्रुतीनंतर ई-रिक्षा सुरू हाेण्याचा मार्ग माेकळा हाेणार आहे.माथेरानमध्ये देशातून व परदेशातून माेठ्या संख्येने पर्यटक येतात. काेराेनाच्या दीड वर्षांत पर्यटन उद्याेग ठप्प झाला हाेता.आता माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी हाेऊ लागली आहे. माथेरान परिसरातील विविध पाॅईन्टस पाहण्यासाठी बरीच पायपीट करावी लागते. यामुळे लहान मुले, वृद्ध दिव्यांग इ. लाेकांना पायी चालतांना खूप त्रास हाेताे. यासाठी हातरिक्षा हाच एकमेव पर्याय आहे. सध्या माथेरानमध्ये हातरिक्षांची संख्या 84 आहे.
 
माथेरानला कल्याणजवळच्या नेरळ मार्गे जावे लागते. माथेरान पर्यावरण संवेदनशील झाेनमध्ये असल्यामुळे तेथे जाण्यासाठी किंवा फिरण्यासाठी ‘हातरिक्षा’ शिवाय काेणतेही साधन नाही व इतर काेणतेही वाहन चालविण्याची माथेरान प्रशासन परवानगी देत नाही. त्यामुळे कित्येक वर्षांपासून हातरिक्षा चालतात.विज्ञान आणि टे्ननाॅलाॅजीच्या या आधुनिक काळात हातरिक्षा एक प्रकारचे ‘दूषण’ आहे. त्यामुळे हातरिक्षा संघटनेने ई-रिक्षा चालू करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मुंबई हायकाेर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता हायकाेर्ट काय निर्णय घेते, याबाबत हातरिक्षाचालक आणि पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.