डोक्याच्याआधारे बॅलन्स करून सर्कसपटू चढले 90 पायऱ्या

    20-Nov-2021
Total Views |
 
 

circus_1  H x W 
 
दाेन भावांनी हा पराक्रम करून गिनीज रेकाॅर्ड बनविल जीवनात संतुलन यशाची पायरी असते आणि पायरीवर संतुलन असले तर ते वर्ल्ड रेकाॅर्ड ठरते. व्हिएतनामच्या दाेन सर्कस कलाकारांनी बॅलन्सच्या आधारे वर्ल्ड रेकाॅर्ड बनविले आहे. एका कलाकाराच्या डोक्यावर, डोक्याच्या आधारे दुसरा कलाकार उभा राहिला.आणि हा बॅलन्स कायम ठेवून पायऱ्या चढून आव्हान पूर्ण केले.व्हिएतनाममध्ये सर्कसमध्ये काम करणारे दाेन भाऊ सर्कशीतील जाेडी म्हणून व्हिएतनाममध्ये खूप प्रसिद्ध आहेत. या जाेडीचे नाव आहे जियांग क्वोक नघीप आणि जियांग क्वोक.
 
दाेघांनी स्पेनच्या गिराेना नावाच्या जागेवर सन् 2017 मध्ये 52 सेकंदांत हे रेकाॅर्ड केले हाेते. हे रेकाॅर्ड करण्यासाठी त्यांनी 15 वर्षे मेहनत केली हाेती.सर्वात माेठे आव्हान तर हे हाेते की, एका कलाकाराच्या डाे्नयावर दुसरा कलाकार काेणताही आधार न घेता, केवळ डोक्याच्या आधारे उभा राहिला पाहिजे. दाेन्ही कलाकारांना 90 पायऱ्या सलगपणे चढायच्या हाेत्या. या दरम्यान पायऱ्या चढणाऱ्या कलाकारांच्या समाेर आव्हान हे हाेते की, काेणत्याही प्रकारचा जर्क किंवा झटका लागू नये.नाहीतर वर डोक्याच्या आधारावर उभा असलेला कलाकार खाली पडू शकत हाेता.तसेच दुसऱ्या कलाकाराला काेणत्याही स्थितीत संतुलन साेडायचे नव्हते. कारण सपाट जागेवर चालताना संतुलन ठेवता येते. पण 90 पायऱ्या चढताना काेन थाेडा बदलताे. त्यामुळे ताेल जाण्याचा धाेका असताे.