एकटेपणा हा माेठा आजार

    20-Nov-2021
Total Views |
 
 

alone_1  H x W: 
सामान्यतः आपल्याला असं बघायला मिळतं की, डाॅμक्टरांनी ज्या व्यक्तींविषयी असे सांगितलेले असते की, हा रुग्ण वाचण्याची किंवा बरा हाेण्याची शक्यता खूपच कमी आहे.त्यापैकी काही लाेक केवळ वाचतच नाहीत तर अनेक वर्षांपर्यंत निराेगी आयुष्य जगतात. असं काेणी मान्य करत नाही की, प्रेमात चमत्काराची अदभूत शक्ती आहे? यावरून हे सिद्ध हाेते की, उपचारांशिवायही एक गाेष्ट आहे, जी आपल्याला आजारापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी मदत करते. ती गाेष्ट म्हणजे प्रेमाची अनुभूती.ज्यामुळे आजाराशी लढणाऱ्या हार्माे न्सची सक्रियता तीव्र हाेते. यामुळे आपल्यामध्ये जगण्याची लालसा बलवत्तर हाेते. आपण यामुळे आजारांवर नियंत्रण मिळवू शकताे. याचा अर्थ असा मुळीच नाही की, आहार आणि औषधं यांना काहीच महत्त्व नाही. तात्पर्य हेच की, प्रेम करण्याची जाणीव केवळ आजारांपासून मुक्ती मिळविण्यासाठीच नाही तर निराेगी जीवन जगण्यासाठीही खूप आवश्यक आहे.
 
स्वीडनमध्ये नुकत्याच झालेल्या एका संशाेधनात आढळले की, ज्या व्य्नती एकांत आणि एकटेपणाला बळी पडतात, त्यांचा अवेळी मृत्यू हाेण्याची शक्यता इतरांच्या तुलनेत चार पट अधिक असते. यासंबंधी अधिक वयाच्या व्य्नतींवर एक अध्ययन केले.
यामध्ये आढळले की, ज्या व्य्नतींना प्रेम, आदर आणि भावनिक मदत मिळत नाही, त्यांचा अकाली मृत्यू हाेण्याची शक्यता इतरांच्या तुलनेत दाेन पट अधिक असते.कुटुंबातील सदस्य, सहकारी आणि आपल्या संप्रदायातील लाेकांबराेबर भावनिक जाेडलेपणाही संसर्गजन्य आजारांपासून बचाव करतात.अशाप्रकारच्या संशाेधनांद्वारे हे निष्कर्ष हाती आले की, जर एखाद्या व्य्नतीला प्रेम आणि आत्मीयता मिळाली तर केवळ त्याचं आराेग्य चांगलं रहातं असं नाही तर ती व्य्नती आजारी पडल्यानंतरही लवकर बरी हाेते. एकांत आणि एकटेपणा कष्ट, राेग, मृत्युच्या भयाची तीव्रता वाढविताे.