अहिल्यादेवींचे स्मारक कर्तृत्वाला साजेसे हव

    20-Nov-2021
Total Views |
 
 

ahilyadevi_1  H 
 
पुण्यश्लाेक राजमाता अहिल्यादेवी हाेळकर यांनी आपल्या संस्थानाबाहेर जाऊन विकासकार्य केले.जात, धर्म, पंथ, प्रांताच्या सीमा ओलांडून देशभर पायाभूत सुविधांची निर्मिती केली. साडेतीनशे वर्षांपूर्वी राजकीय, प्रशासकीय, न्यायदानाच्या पद्धतीत आमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या. दूरदृष्टीच्या शासक, जगातली सर्वश्रेष्ठ महिला राज्यकर्ती म्हणून राजमातांनी केलेले कार्य अलाैकिक आहे. साेलापूरच्या पुण्यश्लाेक अहिल्यादेवी हाेळकर विद्यापीठात उभारण्यात येत असलेले स्मारक राजमातांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे आणि गाैरव वाढवणारे असले पाहिजे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिल्या. स्मारकाचे काम आकर्षक, दर्जेदार व्हावे, अशी अपेक्षा व्य्नत करतानाच स्मारकासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.साेलापूरच्या पुण्यश्लाेक अहिल्यादेवी हाेळकर साेलापूर विद्यापीठात उभारण्यात येत असलेल्या राजमाता अहिल्यादेवींच्या स्मारकाचा आराखडा आणि कामाचे सादरीकरण पवार यांच्या कार्यालयात करण्यात आले.
 
साेलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, नियाेजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्ताेगी, पुण्यश्लाेक अहिल्यादेवी हाेळकर साेलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डाॅ. मृणालिनी फडणवीस (व्हीसीद्वारे), विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ. विकास घुटे (व्हीसीद्वारे), पुण्यश्लाेक अहिल्यादेवी हाेळकर स्मारक समितीचे सदस्य रविकांत हु्नकेरी, बाळासाहेब पाटील (बंडगर), बाळासाहेब शेवाळे, श्रावण भावर, स्मारक समितीचे कार्यकारी अभियंता गिरीश कुलकर्णी,वास्तुविशारद दिनकर वराडे, काशिनाथ वराडे आदींसह वरिष्ठ अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित हाेते.अहिल्यादेवींचे स्मारक भावी पिढीला त्यांच्या कार्याची ओळख करून देईल, प्रेरणा देईल. हे स्मारक पुढील शेकडाे वर्षे दिमाखातउभे राहिले पाहिजे.राजमाता अहिल्यादेवींचा पुतळा राष्ट्रीय महामार्गावरून दिसेल असा उत्तराभिमुख उभारावा, अशी सूचनाही पवार यांनी केली.