वैद्यकीय महाविद्यालयांतील यंत्रणा सक्षम करा

    19-Nov-2021
Total Views |
 
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश : अतिविशेषाेपचार रुग्णालयासाठी पीपीपी धाेरण
 
 

medical_1  H x  
यवतमाळमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात घडलेली घटना गंभीर असून, राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर संबंधित अधिष्ठांत्यांमार्फत भर देण्यात यावा, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषाेपचार रुग्णालय स्थापन करण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारीसंदर्भात (पीपीपी) आढावा बैठक मंत्रालयात घेण्यात आली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण सचिव साैरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डाॅ. दिलीप म्हैसेकर, नाेडल ऑफिसर डाॅ. संजय बिजवे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित हाेते.
 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषाेपचार रुग्णालय स्थापनेसाठी पीपीपी धाेरण ठरवले आहे. काही जिल्ह्यांतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये पीपीपी तत्त्वानुसार बांधण्याचे प्रस्तावित असल्याने वैद्यकीय शिक्षण संचालनालयान संबंधित जिल्ह्यांचा केलेला आढावा सादर करावा. तसेच, या अहवालात वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी लागणारे आवश्यक मनुष्यबळासह रुग्णालयासाठी लागणाऱ्या साधनसामग्री बाबतही माहिती द्यावी. राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणी करीत असताना यासाठी पदनिर्मितीही करावी लागणार असल्याने याबाबतचा अहवालही येत्या 15 दिवसांत सादर करण्यात यावा, अशा सूचना देशमुख यांनी दिल्या.