सर्व तालुक्यांत प्रशासकीय इमारती बांधणार

    19-Nov-2021
Total Views |
 
 
उपमुख्यमंत्र्यांची माहिती : कर्जतमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
 

CM_1  H x W: 0  
 
कर्जत शहर व तालुक्यातील रस्ते आणि विविध विकासकामांचे नियाेजन केले आहे. या विकासकामांमुळे कर्जत शहराच्या वैभवात भर पडणार आहे. राज्यातील सर्व तालुक्यांत टप्प्याटप्प्याने प्रशासकीय इमारती बांधण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत येथे सांगितले.कर्जत शहरातील व तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लाेकार्पण करताना पवार बाेलत हाेते. सार्वजनिक बांधकाममंत्री अशाेक चव्हाण, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार राेहित पवार, आमदार राजेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित हाेते.
 
कर्जत तालुक्याच्या विकासाचा राेडमॅप तयार करण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने एकशे पंचेचाळीस काेटींची कामे करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. सत्तार व भरणे यांनी कर्जत तालुक्यातील विकासकामांचे काैतुक केले.कर्जत पंचायत समिती विस्तारित बांधकाम, बस डेपाे व व्यापारी संकुलाचे बांधकाम, तालुका ।प्रशासन प्रशासकीय इमारत बांधकाम, तलाठी कार्यालय, महसूल कर्मचारी निवासस्थाने, शासकीय विश्रामगृह बांधकाम, तसेच पाेलीस अधिकारी व कर्मचारी वसाहत निर्माण कामांचा या विकास कामांत समावेश आहे.