केंद्रीय आराेग्यमंत्री मंडाविया यांच्याकडे आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांची मागणी काेव्हिशिल्डच्या दाेन मात्रांतील अंतर कमी करावे, अशी मागणी सार्वजनिक आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांनी केंद्रीय आराेग्यमंत्री मनसुख मंडाविया यांच्याकडे केली.टाेपे यांनी मंडाविया यांची निर्माण भवनात भेट घेतली. या भेटीदरम्यान टाेपे यांनी मंडाविया यांना राज्यातील काेराेना स्थिती, त्यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या उपाययाेजना, लसीकरणाच्या बाबतीत मुंबई महापालिकेने केलेले उल्लेखनीय काम आदी मुद्द्यांबाबत सविस्तर माहिती दिली.लसीकरण जलद गतीने करण्याच्या दृष्टीने काेव्हिशिल्डच्या दाेन डाेसमधील अंतर 84 दिवसांवरून 28 दिवसांपर्यंत करता येईल का, याचा फेरविचार करावा, असे टाेपे यांनी सांगितले. काही देशांत दाेन मात्रांतील अंतर कमी करण्यात आले आहे. त्याप्रमाणे आपल्या देशातही विचार व्हावा.
परदेशी नाेकरी अथवा शिक्षणासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी दाेन मात्रांतील अंतर कमी करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे याचाही विचार व्हावा, अशी विनंती टाेपे यांनी मंडाविया यांना केली. काेराेनाची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून आराेग्य कर्मचाऱ्यांना काेराेना लसीचा बुस्टर डाेस देण्याबाबत विचार करावा. शाळा सुरू करणे सुरक्षित हाेण्यासाठी 18 वर्षांखालील मुलांचे लसीकरण लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणीही टाेपे यांनी केली.मुंबई पालिकेने लसीकरणाच्या बाबतीत केलेल्या कामगिरीबाबत मंडाविया यांनी काैतुक केले. मुंबई पालिकेने लसीकरणाच्या पहिल्या मात्रेचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. या कामगिरीबद्दल मंडाविया यांनी टाेपे यांचे अभिनंदन केले. मुंबईसारख्या महानगरात लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करणे, ही माेठी कामगिरी आहे. राज्यातील इतर शहरांतही अशाच पद्धतीने लसीकरण केले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.