भारतीय महिला पाॅझिटिव्ह अ‍ॅप्राेचच्या बाबतीत सर्वश्रेष्ठ

    18-Nov-2021
Total Views |
 
 

WOMEN_1  H x W: 
 
एकेकाळी भारतीय महिलांना अबला, लाजाळू, चूल व मूल इतकेच कार्यक्षेत्र असलेल्या समजण्यात येत हाेते. आता हे जुने विचार बदलण्याची वेळ आली आहे. कारण आता भारतीय महिला पाॅझिटिव्ह अ‍ॅप्राेच आणि आत्मविश्वासाच्या बाबतीत सर्वश्रेष्ठ असल्याचे सिद्ध झाले आहे. असा दावा नुकत्याच करण्यात आलेल्या अध्ययनात करण्यात आला आहे.भारतीय महिला जगातील इतर विकसित देशापेक्षाही खुल्या विचारांच्या बनल्या आहेत आणि संधी मिळताच त्या सिद्धसुद्धा करतात.फलिप्स ग्लाेबल ब्युटी इंडेक्सनुसार, भारतीय म हिला जगात सर्वांत जास्त आत्मविश्वासू आहेत. इतकेच नव्हेतर 91% महिला स्वत:ला साैंदर्यवान मानतात. त्या घर आणि ऑिफस अशा दाेन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळतात. आपल्या समाधानासाठी त्या वेळ काढतात व नव्या-नव्या कला शिकतात. त्या साैंदर्य स्पर्धेत नुसत्या भाग घेत नाहीत, तर जिंकतातसुद्धा.
 
सन 1994 मध्ये ज्यावेळी सुष्मिता सेन मिस युनिव्हर्स स्पर्धेत विजयी झाली, तेव्हापासून आजपर्यंत साैंदर्य स्पर्धेत भारतीय तरुणी उत्साहाने भाग घेत आहेत. भारतीय महिलांमधील आत्मविश्वास तपासण्यासाठी द सेकंड ग्लाेबल ब्युटी स्टडीद्वारे 11000 पेक्षा जास्त भारतीय महिलांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यावेळी असे निष्पन्न झाले की, महिला आपल्या काैशल्याच्या बाबतीत ठाम असतात. त्यांच्यात भरपूर आत्मविश्वास असताे. जगात हाेणाऱ्या घडामाेडींच्या बाबतीत त्या त्यांचे मत निर्धास्तपणे व्यक्त करतात. याचे बरेच श्रेय भारतीय कुटुंबाच्या स्ट्रक्चरला आहे. भारतीय महिला आपल्या मुलीला शिक्षणासाेबतच आव्हान पेलणेही शिकविते. आता समाजात एक प्रकारचा सकारात्मक बदल दिसून येत आहे. साैंदर्य स्पर्धेत भाग घेणाऱ्या तरुणी सुशिक्षित असतात व त्यांच्या कुटुंबाचाही त्यांना पाठिंबा असताे. त्यामुळे त्या बिनधास्त प्रगती करतात.