मुलांना इंटरनेट संदर्भात कडक शिस्त लावू नका

    17-Nov-2021
Total Views |
 
 

internet_1  H x 
 
 
इंटरनेटच्या वापरासंबंधी मुलांशी खुलेपणाने चर्चा करा. नुसती बंधने टाकून काहीच उपयाेग हाेणार नाही. तुम्ही जितकी खुलेपणाने चर्चा कराल त्यातून तुम्हाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे कळू शकेल की तुमचे मूल इंटरनेटवर नेमके काय पाहतात काय सर्फिंग करतात.तुम्ही कधी कधी त्यांच्या साेबत इंटरनेटवर वेळ घालवा, त्यांच्याकडून इंटरनेटवरच्या गाेष्टी शिका, गेम खेळा, थाेडक्यात त्यांच्याशी मैत्री करा.
 
मुलांना इंटरनेट सुरक्षेची माहिती द्या : कधीही नेटवर आपली माहिती संपूर्ण तपशिलासकट अपलाेड करू नये, साेशल नेटवर्किंग साईटसवर खूप पर्सनल फाेटाे टाकू नयेत, आपण नेटवर काेणाशी चॅटिंग करत आहाेत याबद्दल बाळगलेली सावधानता या आणि अशा अनेक गाेष्टींबद्दल मुलांना सतर्क करा. मुलांना इंटरनेट सुरक्षेची माहिती द्या.
 
कंप्यूटर काॅमन रूममध्ये ठेवा : शक्य झाल्यास कंप्यूटर काॅमन रूममध्ये ठेवा जेणेकरून घरातील काेणती व्यक्ती कितीवेळ कंप्यूटरवर बसली आहे हे कळेल. नेटसाठी तुम्ही टाईम लिमिट ठेवू शकता. साधारणपणे मुलांचे ऑनलाईन फ्रेंडस काेण आहेत याकडे लक्ष ठेवा.
 
पेरेंटल कंट्राेल साॅफ्टवेअरचा करा उपयाेग : हे साॅफ्टवेअर तुमच्या कंप्यूटरवर हाेणाऱ्या सगळ्या गाेष्टीकडे लक्ष ठेवते, त्याचे रेकाॅर्ड ठेवते. या साॅफ्टवेअर द्वारा तुम्ही ऑब्जेक्शनल साईटस,पाेर्न साईटस ब्लाॅक करू शकता.