जवाहर बालभवनतर्फे चित्रकला स्पर्धा

    17-Nov-2021
Total Views |
 
 

competition_1   
 
पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त यंदा जवाहर बालभवनतर्फे आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा बालभवनात आयाेजिण्यात आली हाेती.स्पर्धेतील मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी बालभवन नियामक मंडळाच्या अध्यक्ष तथा शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड उपस्थित हाेत्या. प्रा. गायकवाड यांनी या मुलांच्या कलाकृतींची पाहणी केली व सर्व मुलांचे काैतुक केले.या स्पर्धेसाठी 35 शाळांतील 100पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतला हाेता. या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व मुलांना बालभवनतर्फे रंगपेट्या व स्पर्धेतील सहभागाबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले. परीक्षणासाठी विशेष परीक्षक नेमण्यात येणार असून, त्यांच्यामार्फत घाेषित केलेल्या उत्कृष्ट चित्रांना जवाहर बालभवनच्या फेब्रुवारी 2022च्या वर्धापन दिनी पारिताेषिके देण्यात येणार आहेत.