दुबई एक्स्पोमध्ये 4 मजली वाॅटरफाॅलचे आकर्षण

    15-Nov-2021
Total Views |
 
 
 

dubai_1  H x W: 
 
संयु्नत अरब अमिरात या आखाती देशात सध्या दुबई एक्स्पो - 2021 आयाेजित करण्यात आला असून, त्याचे समाप्ती मार्च 2022 मध्ये हाेणार आहे. हा एक्स्पो सप्टेंबर 2021 मध्ये सुरू झाला आहे. या एक्स्पोमध्ये जगभरातील बड्या कंपन्यांचे स्टाॅल्स आहेत. यापैकी डी.पी.वल्डर्स फ्लाे पॅव्हेलियनमध्ये तयार केलेला चार मजली वाॅटरफाॅल (धबधबा) पर्यटकांचे जबरदस्त आकर्षण बनला आहे. रंगीबेरंगी प्रकाशात झगमग करणाऱ्या हा धबधबा पाहण्यासाठी माेठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. या एक्स्पोद्वारे दुबई बिझनेस आणि पर्यटकांना आकर्षित करून आपली अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण काेराेना काळात इतर देशांप्रमाणेच संयु्नत अरब अमिरातीचीही अर्थव्यवस्था ढासळली आहे. ती सावरण्याचा हा प्रयत्न आहे.