नातं फ्रेश राहण्यासाठी काय करता येईल?

    10-Nov-2021
Total Views |
 
 
 

relationship_1   
 
आपल्या नात्याचे राेपटे हिरवेगार आणि डाैलदार राहावे, असे वाटत असेल, तर त्याला प्रेम, आपुलकी आणि काळजी यांचे सिंचन आणि खतपाणी घालावे लागते. हे नेमके कसे करावे, यासाठी खालील गाेष्टी न्नकी वाचा.
 
1. आपल्याला आपले वागणे, बाेलणे नेहमी बराेबर वाटत असते.त्यामुळे कळत नकळतपणे आपण आपल्या जवळच्या माणसांवर आपण आपले असणे, आपल्या आवडीनावडी लादत असताे.असे करू नका. माणसं त्यांच्या गुणदाेषांसकट स्वीकारा. यामुळे आपसूकच तुमचा त्यांच्याशी असणारा संवाद हृद्य हाेईल.लाेकांनी आपल्याला सन्मानाने वागवावे, असे आपल्याला वाटते, तर ताे सन्मान आपण आधी इतरांचा केला पाहिजे.
 
2. काेणत्याही नात्यात अहंकार आला, की ते सुकायला लागते. आपल्या माणसांची माफी मागायला अजिबात मागे पुढे पाहू नका. विशेषतः ती व्य्नती लहान आहे की माेठी, याचे बंधन पाळायचे गरज नाही. तुमची चूक झाली असेल, तर पाच वर्षांच्या मुलाची किंवा मुलीचीदेखील मनापासून माफी मागा, तसेच नात्यातल्या माणसाची चूक झाली असेल, तर त्यांना माफ करायला देखील शिका. मनात अजिबात राग धरू नका. आपण जर आपल्याच माणसांविषयी गैरसमज करून घेतल्यास बाेलणे बंद हाेते आणि मग अधिकच गुंता तयार हाेताे.आपण पाहताे की आपल्याकडे लग्नसमारंभात रुसवे फुगवे करण्याची काही नातेवाइकांमध्ये चढाओढ लागेलेली असते. असे अजिबात वागू नका.
 
3. आपण सगळेच बिझी असताे, पण आपल्या कामाच्या यादीत जगण्याला, आपल्या जवळच्या माणसांना प्राधान्यक्रम द्यायला विसरू नका. सुटीच्या दिवशी असेल किंवा तुम्ही कुठे पिकनिकला गेलात, तर अशा वेळी पूर्ण वेळ त्यांना द्या आणि एक लक्षात घ्या, केवळ त्यांना आपली गरज असते असे नाही, तर आपल्यालादेखील त्यांची गरज असते.
 
4. नाते आहे म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाचे माहीत पाहिजे असे काहीही नसते. प्रत्येकाला आपली स्पेस पाहिजे असते आणि ती प्रत्येकाला मिळाली पाहिजे.माेकळेपणा आणि त्या त्या माणसाची वैय्नितकता याचा समताेल ठेवायला प्रत्येकाने शिकले पाहिजे.