गिर्याराेहण अभ्यासक्रम पुणे विद्यापीठात सुरू

    28-Oct-2021
Total Views |
 
देशात प्रथमच प्रारंभ; विजयादशमीला झाली सुरुवात
 

SPPU_1  H x W:  
 
गिर्याराेहणातील पहिला पदविका अभ्यासक्रम पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू करण्यात आला आहे. ‘डिप्लाेमा इन माउंटेनिअरिंग’ असे त्याचे नाव असून, विजयादशमीच्या मुहूर्तावर त्याला प्रारंभ झाला.‘गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग’ (जीजीआयएम) आणि ‘नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग’ (एनआयएम) या संस्थांनी डिप्लाेमाचा अभ्यासक्रम तयार केला आहे. हा अभ्यासक्रम एक वर्षाचा असून, 18 ऑ्नटाेबरपासून त्याला सुरुवात झाली. 132 विद्यार्थ्यांनी त्यासाठी प्रवेश घेतला असून, त्यातील 45 जणांची निवड गुणवत्तेवर करण्यात आली आहे. थिअरी आणि प्रॅ्निटकल यांचा मेळ या अभ्यासक्रमात असून, गिर्याराेहण तसेच साहसी क्रीडाप्रकारांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन त्यात मिळणार आहे. थिअरची ले्नचर्स ऑनलाइन हाेतील आणि प्रॅ्निटकलसाठी विद्यार्थ्यांना सह्याद्री तसेच हिमालयात नेले जाईल.
 
हिमालयातील गिर्याराेहणाचा अनुभव घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्चमध्ये उत्तरकाशीतील ‘नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग’ 24 दिवसांचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. विद्यार्थ्यांना सुयाेग्य प्रशिक्षण देण्याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि ‘जीजीआयएम’ने ‘एनआयएम’बराेबर करार केला आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. नितीन करमळकर म्हणाले, ‘गिर्याराेहणाचा अभ्यासक्रमात समावेश करून विद्यापीठाने आपल्या शैक्षणिक कक्षेचा विस्तार केला आहे. देशात प्रथमच हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट झाला आहे.’ हिमालयातील प्रशिक्षणाचे महत्त्व नमूद करताना ‘एनआयएम’चे प्रमुख कर्नल अमित बिष्ट म्हणाले, की एक वर्षाचा हा अभ्यासक्रम छंद आणि व्यवसाय यांचा मेळ घालणारा आहे.विद्यार्थ्यांना आमच्या संस्थेबराेबरच हिमालयातही प्रशिक्षण दिले जाईल. ‘हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचे जीवन बदलणारा ठरेल. त्यातून ते अनेक नव्या गाेष्टी शिकतील,’ अशी प्रतिक्रिया ‘जीजीआयएम’चे संस्थापक-संचालक उमेश झिरपे यांनी व्यक्त केली.