शाळांच्या पायाभूत सुविधांबराेबरच शैक्षणिक गुणवत्ता वाढीवरही भर देणार

    26-Oct-2021
Total Views |
 
 

education_1  H  
 
जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक आणि भाैतिक विकास करून आदर्श शाळा याेजना राबवणे आणि निजामकालीन शाळांचा विकास करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. शाळांच्या पायाभूत सुविधांबराेबरच शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे शासनाचे उद्दिष्ट असल्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले.निजामकालीन शाळांचा विकास आणि आदर्श शाळा याेजनेबाबत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रा. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शालेय शिक्षण आयुक्त विशाल साेलंकी, प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक टेमकर यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित हाेते. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करावे. शाळा दुरुस्तीसाठी नियाेजन आवश्यक असून, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून निधी उभा करावा, असे निर्देश प्रा. गायकवाड यांनी दिले. आदर्श शाळा याेजनेसाठीचा निधी लवकरच वितरित केला जाईल, असे वंदना कृष्णा यांनी सांगितले.